उत्तर प्रदेशातील कानपूर येथील जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. युगल राजपूत यांनी न्यूज18 ला सांगितलं की, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की गुप्तांगाचे केस शरीराच्या संरक्षणात्मक थराचं काम करतात आणि त्यामुळे ते काढत नाहीत. पण ही चूक करू नये. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात लोकांना खूप घाम येतो आणि तो या केसांमध्ये जमा होऊ शकतो. यामुळे बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. म्हणून, या भागातील केस वेळोवेळी काळजीपूर्वक काढून टाकावेत. पण जर एखाद्याला त्वचेशी संबंधित समस्या असेल तर केस काढण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
बायको म्हणाली, 'शेजारणीला प्रेग्नंट करा', नवराही गोंधळला, नेमकी भानगड काय? Watch Video
डॉक्टरांनी सांगितलं जर हे केस फार लांब नसतील तर ते काढले नाही तरी चालेल. पण हा भाग नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे. जर तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतली तर कोणतीही समस्या येणार नाही.
प्रायव्हेट पार्टवरील केस काढण्याचा धोका
याशिवाय, जर तुम्हाला केस काढायचे असतील तर यामध्ये अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने गुप्तांगाचे केस काढल्याने कधीकधी त्वचेला दुखापत होऊ शकते आणि कट किंवा पुरळ येऊ शकते. शेव्हिंग किंवा वॅक्सिंगमुळे होणारे छोटे कट प्रायव्हेट पार्टभोवतीच्या संवेदनशील त्वचेत संसर्गाचा धोका वाढवतात. अशा परिस्थितीत, हे केस अत्यंत सावधगिरीने काढून टाकले पाहिजेत.
कुणी 20 वर्षांनी मोठी, कुणी विवाहित! 'भाभीजी'च्या प्रेमात का पडत आहेत तरुण, नात्याचा शेवट मृत्यू
प्रायव्हेट पार्टवरील केस कसे काढावेत?
तज्ञांच्या मते, जर तुम्हाला प्रायव्हेट पार्टचे केस काढायचे असतील तर प्रथम केस ट्रिम करा, नंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. त्यानंतर चांगल्या दर्जाचं शेव्हिंग क्रीम किंवा जेल वापरा. तसंच शेव्हिंगसाठी असा रेझर वापरा, ज्यामध्ये कापण्याचा धोका खूप कमी असतो. या भागात केसांच्या दिशेने शेव्ह करा आणि शेव्हिंग केल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. ज्यांची त्वचा जास्त संवेदनशील आहे ते याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.
