बायको म्हणाली, 'शेजारणीला प्रेग्नंट करा', नवराही गोंधळला, नेमकी भानगड काय? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Video Viral : कपलचा एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चक्क बायकोने आपल्या नवऱ्याला शेजारणीला प्रेग्नंट करायला सांगितलं आहे.
नवी दिल्ली : पती-पत्नीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. काही व्हिडिओंमध्ये पती-पत्नी एकमेकांशी भांडत असतात, तर काही व्हिडिओंमध्ये ते एकमेकांसाठी कोणाशीही भांडतात. काही व्हिडिओंमध्ये ते नाचत असतात तर काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की आपण विचारही करू शकत नाही. असाच कपलचा एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चक्क बायकोने आपल्या नवऱ्याला शेजारणीला प्रेग्नंट करायला सांगितलं आहे.
पती-पत्नीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती मोबाईल हातात घेऊन मोबाईलमध्ये पाहत आहे. अचानक एक महिला रूमच्या बाहेरून धावत रूममध्ये येते. हे दोघंही नवरा-बायको आहे.
बायको नवऱ्याला सांगते शेजारणीला प्रेग्नंट कर, पत्नीचं बोलणं ऐकून नवऱ्यालाही धक्का बसतो. आपण काही चुकीचं ऐकलं की काय असं त्याला वाटतं, म्हणून तो पुन्हा तिला काय म्हणाली विचारतो? ती पुन्हा तेच बोलते. तेव्हा मात्र नवरा भडकतो आणि म्हणतो, तू वेडी झाली आहेस का? तू काय म्हणते आहेस? यावर बायको म्हणते, यात भडकण्यासारखं काय आहे? तिला प्रेग्नंट कर, मी एक पार्सल आणलं आहे. माझा UPI काम करत नाही आहे, म्हणून तू तिला प्रेग्नंट कर." तेव्हा पतीला पुन्हा धक्का बसतो. तो म्हणजे त्याला प्रेग्नंट नाही पेमेंट म्हणतात.
advertisement
advertisement
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @shimlagirlviyankaofficial नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे, हे स्पष्ट दिसतं आहे. स्वतःला शिमला गर्ल म्हणवणारी वियंका व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती स्वतः व्हिडिओमध्ये अभिनय करत आहे. ही संकल्पना 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतून घेतली गेली आहे, ज्यामध्ये अंगूरी भाभी अनेकदा असे हास्यास्पद शब्द बोलते.
advertisement
पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत तो 83 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी 1 लाख 32 हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे, तर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत.
Location :
Delhi
First Published :
July 17, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बायको म्हणाली, 'शेजारणीला प्रेग्नंट करा', नवराही गोंधळला, नेमकी भानगड काय? Watch Video