वंधत्व म्हणजे काय तर जोडप्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटला गेला आहे ते बाळासाठी प्रयत्न करत आहेत आणि बाळ होत नाहीत याला आपण म्हणू शकतो. या मग विविध अशी कारणे आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली त्यामध्ये ताणतणाव आहार किंवा इतरही गोष्टींचा समावेश होतो. त्यासोबतच महिलांमध्ये आई होण्याचं वय देखील वाढत चाललं आहे. 35 नंतर आई होण्याचं प्रमाण वाढत चालले आहे आणि ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण की महिला या करिअरकडे लक्ष देतात आणि त्यामुळे वय वाढता आणि त्यानंतर या समस्या उद्भवत चाललेल्या आहेत.
advertisement
सध्याला आपला आहार देखील हा चांगला राहिलेला नाही आहे. ज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भेसळ झालेली आहे. केमिकल्स आणि हे सर्व गोष्टी आहेत. वंधत्वाची समस्या जर तुम्हाला टाळायचे असेल तर तुम्ही लवकर लग्न करून लवकर आई व्हावं म्हणजेच की तिशीचा आत मध्ये बाळ होऊ द्यावं त्यानंतर आपला आहार चांगला करावा, धूम्रपान करू नये, ताण जास्त घेऊ नये, नियमित व्यायाम करावा जर तुमचं वजन वाढलं असेल तर वजन कमी करावं आणि पार्टनर सोबत म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवावी. त्यासोबतच वारंवार गर्भनिरोधकाच्या गोळ्या घेऊ नये. ह्या गोष्टी केल्या तर तुम्हालाही समस्या उद्भवणार नाही.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ही सर्व जर काळजी तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचे समस्या उद्भवणार नाही.