कांदा जो आपण खाद्यपदार्थांसाठी वापरतो. आमटी, डाळ, भाजीत कांद्याची फोडणी असते. कांदा भजी, कांदा भाजी असे कांद्यापासून वेगवेगळे पदार्थही बनवतो. असा हा कांदा आता सौंदर्यप्रसाधनातही वापरला जातो. बरेच लोक केसांच्या समस्यांसाठी कांदा वापरतात. कांद्याचा रस केसांना लावतात किंवा कांद्याचं तेल वापरतात. कांद्याचे काही प्रोडक्ट्सही बाजारात उपलब्ध झाले आहेत.
मासिक पाळीच्या दिवसात डोक्यावरून अंघोळ का करायची? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण
advertisement
कांद्यातील पोषक घटक म्हणाल तर यात भरपूर प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबर असतात. यातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक आरोग्य, ऊती दुरुस्ती, कोलेजन उत्पादन आणि लोह शोषण नियंत्रित करण्यास मदत करतं. तसंच व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करते जे फ्री रॅडिकल्समुळे झालेल्या पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करतं. कांदे व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी समृध्द असतात. फोलेट जे चयापचय, तंत्रिका कार्य आणि लाल रक्तपेशींचे उत्पादन सुधारतात. कांद्यामध्ये खनिजे, पोटॅशियम भरपूर असते, जे नियमित सेल्युलर फंक्शन, मज्जातंतूंचे संक्रमण, द्रव संतुलन, स्नायू आकुंचन आणि मूत्रपिंडाच्या कार्यासाठी आवश्यक असतात.
असा हा पोषणमूल्यांनी भरलेला कांदा केसांसाठी किती फायद्याचा. याबाबत तज्ज्ञ सांगतात, "कांद्याच्या रसात सल्फर असतो. सल्फर चांगला एक्सफ्लोएटिंग आहे. त्यामुळे जिथं डँड्रफ असेल तिथं तो तुमची स्कॅल्प म्हणजे डोक्याची त्वचा चांगली क्लिन करतो. त्यामुळे तो तिथं चांगला परिणाम करेल आणि डँड्रफमुळे होणारा हेअरफॉल थांबेल. तिथं त्याचा उपयोग होऊ शकतो पण केसवाढीसाठी याचा काही उपयोग नाही"
काय! दुधामुळे कॅन्सर होतो? डॉक्टरांनीच सांगितला कसा होतो परिणाम
"दुसरं केसांच्या रंगाचं म्हणाल तर आपल्या हेअर फॉलिकलच्या इथं मेलानिन सिंथेसिस व्हायला पाहिजे ते तिथं होत नाही त्यामुळे केस पांढरे होतात. मेलानिन सिंथेसिस डिस्टर्ब होतं. ते पिगमेंटच तिथं फॉर्म होत नाही म्हणून केस पांढरे होतात. कढीपत्ता, कलोंजी यामध्ये हा मेलानिन सिंथेसिस घटक आहे असं कोणत्याही अभ्यासात अद्याप समोर आलेलं नाही. ज्यामुळे तुमचे पांढरे केस काळे होतील"
"या सगळ्या उपायांनी तात्पुरत्या कालावधीसाठी केसगळती थांबेल पण रिग्रोथसाठी त्याचा काही उपयोग नाही", अशी माहिती कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. दिपाली चव्हाण यांनी एका पॉडकास्टमध्ये दिली आहे.