हास्य ही माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. हसण्यानं केवळ आपल्याला बरं वाटत नाही तर ते आपल्या शरीर आणि मनासाठी एक प्रकारचं उपचार म्हणून देखील काम करतं. ते चेहऱ्यावरील फक्त हावभाव नाही तर एक नैसर्गिक औषध आहे जे आपलं मन आणि शरीर निरोगी ठेवतं. म्हणूनच तज्ज्ञ दररोज किमान काही मिनिटे मनापासून हसण्याची शिफारस करतात. पण काही लोकांचं हास्य विशेषतः हिरो-हिरोईनचं इतकं गोड असतं की पाहतच राहवंसं वाटतं. अशी स्माईल आपली होऊ शकते का?
advertisement
जिम केल्याने महिला पुरुषांसारख्या दिसू लागतात का; फिटनेस एक्सपर्ट्स काय म्हणतात?
याबाबत ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ. तन्मयी पेंडणेकर यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं, माझ्याकडे एक रुग्ण आला होता. तो मला म्हणाला की मी तसा चांगला दिसतोच. मला अभिनय क्षेत्रात जायचं आहे. पण मला ऋतिक रोशनसारखं दिसायचं आहे. त्यासाठी मी फिजिक करतोय पण दात मला ऋतिकसारखे हवेत. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते. त्या व्यक्तीच्या शरीरारचनेनुसार ते दात त्याला चांगले दिसतात. पण तुम्हालाही ते चांगले दिसतीलच असं नाही. असं आपण डुप्लिकेट नाही करू शकत. डुप्लिकेट झालं तर मग काय अर्थ.
त्यामुळे तुमच्यासाठी जे योग्य आहेत, तुमच्यावर जे आकर्षक वाटतील असेच दात आपण बनवतो. आपण डुप्लिकेट नाही करू शकत, असं डॉ. पेंडणेकर म्हणाल्या.
दातांची काळजी कशी घ्यायची?
आपल्या दातांची आणि आपल्या तोंडाची कशाप्रकारे काळजी घ्यावी, काय टिप्स फॉलो कराव्यात, याविषयी डॉ. माया इंदुरकर यांनी लोकल18 शी बोलताना संपूर्ण माहिती दिली.
एक लोकप्रिय नेता; पण त्याने आयुष्यात कधीच दात घासले नाही, टॉयलेटमध्ये गेला नाही, अंघोळीचाही कंटाळा
1) सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या ब्रश करायला पाहिजे. ब्रश केल्यामुळे तुमचे बरेच आजार हे कमी होतात आणि तुमचे दात आणि तुमच्या हिरड्या मजबूत होतात. किमान पाच मिनिटे तरी तुम्ही व्यवस्थितरित्या ब्रश करणं गरजेचं आहे. सकाळी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर ब्रश हा करायलाच हवा. त्यासाठी तुम्ही मऊ अशा ब्रशचा आणि चांगल्या टूथपेस्ट वापर हा करायला हवा.
2) दर 6 महिन्याला डॉक्टरांकडे जाऊन दाखवावे आणि सर्व दातांची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी.
दातांमध्ये जर काही अडचण असेल किंवा कोणता आजार असेल तर त्यावर तुम्ही लगेच उपचार करायला हवा.
3) सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान हे टाळावं. सिगारेट, तंबाखू, दारू यांचा सेवन करू नये. यामुळेही तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं.
4) आहार व्यवस्थित असायला हवा. आहारामध्ये पालेभाज्या, फळे, तसेच जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज या सर्व गोष्टींचा समावेश असायला हवा. जर तुमचा आहार व्यवस्थित असेल तर तुमचे दात, तुमच्या हिरड्या, तुमचा जबडा हा मजबूत होतो.
5) जेवण केल्यानंतर लगेच कुठलाही चिकट किंवा गोड पदार्थ खाऊ नये आणि जर तुम्ही तो खाल्लास तर त्यानंतर व्यवस्थित गुळण्या करून तोंड स्वच्छ ठेवावा.
हे उपाय तुम्ही जर केलं तर तुमचे दात, तुमच्या हिरड्या, तुमचा जबडा आणि त्याचबरोबर तुमचा आरोग्यदेखील चांगला राहील, असं डॉ. इंदुरकर यांनी सांगितलं.