जिम केल्याने महिला पुरुषांसारख्या दिसू लागतात का; फिटनेस एक्सपर्ट्स काय म्हणतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
After gym woman body look like man : अनेकदा महिलांनी कुठले व्यायाम प्रकार करावेत, कुठले करू नयेत याबाबत अनेक गैरसमज असल्याचं आढळतं. विशेषतः महिलांनी वेट ट्रेनिंग दररोज करू नये, यामुळे त्या पुरुषी दिसतात असं म्हटलं जातं. पण खरंच असं आहे का?
नवी दिल्ली : आजकाल फिटनेसबाबत जागरूकता वाढली आहे. त्यामुळे बरेच लोक जिमला जातात. फक्त पुरुषच नाही तर महिलाही जिम करताना दिसतील. मात्र अनेकदा महिलांनी कुठले व्यायाम प्रकार करावेत, कुठले करू नयेत याबाबत अनेक गैरसमज असल्याचं आढळतं. विशेषतः महिलांनी वेट ट्रेनिंग दररोज करू नये, यामुळे त्या पुरुषी दिसतात असं म्हटलं जातं. पण खरंच असं आहे का?
स्नायू बळकट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या व्यायामांना वेट ट्रेनिंग असं म्हटलं जातं. महिलांनाही वेट ट्रेनिंग दिलं जातं. यामध्ये डंबेल्स, रेझिस्टन्स बँड, वेटलिफ्टिंग, तसंच बॉडीवेटचे अनेक व्यायाम असतात. या वेट ट्रेनिंगचे महिलांना अनेक फायदे होतात. यामुळे हात, पाय, खांद्याचे स्नायू बळकट होतात. महिलांची कार्यक्षमता, चपळता, ताकद वाढते. क्रीडापटू असल्यास त्यांना याचा चांगला फायदा होतो. व्यायाम करतानाच कॅलरी जळतात असं नाही, तर शरीर विश्रांतीच्या स्थितीत असतानादेखील ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे दिवसभर कॅलरी जळतात. त्याचप्रमाणे या व्यायामामुळे शरीरात एंडोमॉर्फिन हॉर्मोनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मूडही सुधारतो.
advertisement
Health Risk Of The Day : वारंवार चेहरा धुणं वाटते चांगली सवय, पण डॉक्टरांनी सांगितले याचे दुष्परिणाम
‘स्ट्रेंग्थ ट्रेनिंग अँड दी रिस्क ऑफ टाइप 2 डायबेटिस अँड कार्डिओव्हस्कुलर डिसीज’ या संशोधनानुसार, ज्या महिलांनी दररोज वेट ट्रेनिंग केलं आहे, त्यांच्यामध्ये टाइप 2 मधुमेहाच्या (Diabetes) शक्यतेत 30 टक्के घट झाली, तर मधुमेहाचा धोकाही कमी झाला. हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार होण्याचं प्रमाणही 17 टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळलं आहे.
advertisement
स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याचं प्रमाणही यामुळे कमी होत असल्याचं आढळलं आहे. वेट ट्रेनिंगमुळे हाडांची घनता सुधारल्याचं दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे बर्याच स्त्रियांमध्ये लीन टिश्यू पातळ असतात; पण वेट ट्रेनिंगमुळे या महिलांचे स्नायू अधिक टोन्ड होतात, तसंच त्यांच्या एकूण कार्यक्षमतेतही वाढ होते. जीवनशैलीमुळे होणारे आजारही दूर राहण्यास मदत होते.
advertisement
त्याच वेळी, वेट ट्रेनिंगमुळे स्त्रिया पुरुषी बळकट दिसतात, तसंच त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो असे गैरसमज आहेत. खरंच असं होतं का? याबाबत फिटनेस ट्रेनर्सनी माहिती दिली आहे.
FITTRच्या प्रशिक्षित ट्रेनर अक्षिता अरोरा यांनी हेल्थशॉट्सला माहिती दिली की, दररोज वेट ट्रेनिंग केल्यामुळे शरीरावर कोणतेही प्रतिकूल परिणाम होत नाहीत; मात्र प्रत्येकाने योग्य मार्गदर्शनाखाली आणि आपल्या शरीराला योग्य असतील असेच व्यायाम करणं आवश्यक आहे. दररोज स्ट्रेंग्थ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणून ओळखले जाणारे फ्री वेट, रेझिस्टन्स बँड, वेटलिफ्टिंग, तसंच बॉडीवेट व्यायाम केल्यामुळे फिटनेसचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होतं आणि त्यांची शरीरयष्टीही आकर्षक होण्यास मदत होते.
advertisement
तर एका पॉडकास्टवर बोलताना फिटनेस एक्सपर्ट महेंद्र गोखले यांनी सांगितलं की, लोकांचा असा गैरसमज आहे की वजन उचलायचं म्हणजे वेट लिफ्टिंग करायचं. वेट लिफ्टिंग नसतं, वेट ट्रेनिंग असतं. म्हणजे तुम्ही एक किलो जरी वजन उचललं, तितका व्यायाम केला तरी तो रेजिस्टंट एक्सरसाइझ असतो. यामुळे जाॅईंट स्टॅबिलायझेशन सुधारतं, मसल्समध्ये क्रॉन्ट्रॅक्शन होतं. तुमची हाडं मजबूत व्हायला चांगली मदत होते.
advertisement
स्त्रिया आणि पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात. हार्मोन्स हे तुमच्या शरीरावर खूप चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली काम करत असतात. कोणत्याही महिलेने कोणत्याही प्रकारचं कितीही वजन उचललं तरी त्या पुरुषांसारख्या दिसणं खूप अवघड असतं. कोणत्या प्रकारचे ड्रग्ज किंवा स्टेरॉईड घेतले तर त्याचा परिणाम वेगळा होतो. पण रेजिस्टंट एक्सरसाइझ, स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग यामुळे नाही, असं गोखले यांनी सांगितलं.
Location :
Delhi
First Published :
October 01, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
जिम केल्याने महिला पुरुषांसारख्या दिसू लागतात का; फिटनेस एक्सपर्ट्स काय म्हणतात?