Diabetes : डायबेटिज एकदा झाला की आयुष्यभर साथ सोडत नाही, हे खरं आहे; डॉक्टर काय सांगतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diabetes cured or not : डायबेटिस झाल्यावर शुगर, इन्सुलिन कंट्रोलमध्ये ठेवता येईल पण डायबेटिज काही पूर्ण बरा होणार नाही, असंच म्हटलं जातं. पण डॉक्टर याबाबत काय सांगतात?
मुंबई : हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटिज आहे. यासाठी ते आहारासंबंधी पथ्य पाळतात, दररोज औषधं घेतात. एकदा का डायबेटिज झाला की झाला. मग तो कायमचा. डायबेटिस झाल्यावर शुगर, इन्सुलिन कंट्रोलमध्ये ठेवता येईल पण डायबेटिज काही पूर्ण बरा होणार नाही, असंच म्हटलं जातं. पण डॉक्टर याबाबत काय सांगतात?
डायबेटिज पूर्ण बरा होतो की नाही हे जाणून घेण्याआधी डायबेटिज म्हणजे काय? डायबेटिज का होतो? त्याची कारणे आणि लक्षणं जाणून घेऊया. मधुमेह ही अशी स्थिती आहे जी तुमच्या रक्तातील साखर किंवा ग्लुकोज खूप जास्त असतं तेव्हा होते. ग्लुकोज शरीरासाठी ऊर्जेचा स्रोत आहे, जो प्रामुख्याने अन्न आणि पेयांमधील कर्बोदकांपासून येतं.जेव्हा ग्लुकोज तुमच्या रक्तप्रवाहात असतं, तेव्हा त्याला त्याच्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी मदतीची आवश्यकता असतं, ते म्हणजे इन्सुलिन. जे स्वादुपिंड बनवतं.
advertisement
जेव्हा स्वादुपिंड पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही. अजिबात तयार करत नाही, शरीर इन्सुलिनच्या परिणामांना योग्यरित्या प्रतिसाद देत नाही, शरीर ते योग्यरित्या वापरत नाही तेव्हा ग्लुकोज रक्तप्रवाहात जमा होतं.ज्यामुळे रक्तातीतल साखरेची पातळी वाढते म्हणजे हायपरग्लाइसेमिया होतो.
advertisement
मधुमेहाचे प्रकार, कारणं, लक्षणं
मधुमेहाचे प्रीडायबेटिज, टाइप 1 मधुमेह, टाइप 2 मधुमेह, टाइप 3सी मधुमेह, प्रौढांमधील सुप्त ऑटोइम्युन मधुमेह, प्रेग्नन्सीतील मधुमेह, लहान मुलांमध्ये परिपक्वता सुरू होणारा मधुमेह, नवजात शिशुतील मधुमेह, ठिसूळ मधुमेह असे अनेक प्रकार आहेत.
इन्सुलिन प्रतिरोधकता, ऑटोइम्यून रोग, हार्मोनल असंतुलन, स्वादुपिंडाचं नुकसान, अनुवांशिक उत्परिवर्तन, काही औषधांचा दीर्घकाळ वापर ही मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकतात.
advertisement
वारंवार तहान लागणं, तोंड कोरडं पडणं, वारंवार लघवी होणं, थकवा, धूसर दृष्टी , वजन कमी होणं, हात किंवा पाय सुन्न होणं किंवा मुंग्या येणं, जखम, व्रण बरं होण्यात वेळ, त्वचा किंवा योनीतून यीस्टचे संक्रमण.
मधुमेह बरा होतो की नाही?
advertisement
डायबेटिज एकदा झाला की कायमचा झाला, तो पुन्हा बरा होत नाही? असं अनेक जण म्हणतात. पण याबाबत डॉक्टर काय म्हणतात. डायबेटिज पूर्णपणे बरा होतो की नाही? आयुर्वेदिक डॉ. विश्वास घाटगे यांनी एका पॉडकास्टवर ही माहिती दिली आहे.
advertisement
डॉ. घाटगे यांनी सांगितलं., डायबेटिज बरा होणार की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. पहिलं म्हणजे त्या रुग्णाला कोणत्या प्रकारचा डायबेटिज आहे, टाइप वन की टाइप टू. दुसरं म्हणजे तो लठ्ठ आहे की सडपातळ आहे, त्याची लाइफस्टाईल कशी आहे. आहारासोबतच स्ट्रेस मॅनेजमेंट कितपत केली जाते. कारण त्याच्यामुळेही शरीरात काही बदल घडतात, पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यातून शुगर लेवल्स वाढायला लागतात.
advertisement
या परिस्थिती नाडी परीक्षणद्वारे त्या व्यक्तीच्या शरीरातील दोष स्थितीचा, पचनसंस्थेचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तो अभ्यास करून त्यांना जर काही विशिष्ट आयुर्वेदिक औषध, आहार आणि व्यायामाचं नियोजन करून दिलं. मानसिक ताण असल्यास त्याला नियोजित करण्यासाठी मेडिटेशन योगासनं यांचा सल्ला दिला तर तो नक्कीच डायबेटिज रिव्हर्स व्हायला मदत होते, असं डॉ. घाटगे म्हणाले.
Location :
Delhi
First Published :
September 27, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : डायबेटिज एकदा झाला की आयुष्यभर साथ सोडत नाही, हे खरं आहे; डॉक्टर काय सांगतात?