त्वचा मऊ ठेवण्यासाठी तेलाची मालिश करा
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ आणि उबदार कपडे यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. यामुले त्वचा अत्यंत कोडरी होत जाते. अशा वेळेस बादाम, नारळ किंवा ऑलिव्ह ऑईलने मालिश केल्याने त्वचेला आवश्यक पोषण मिळते. हलक्या गरम तेलाची मालिश केल्याने त्वचा सॉफ्ट राहते आणि खाज, रॅशेस यापासून त्वरित आराम मिळतो. दिवसातून एकदा तरी तेल लावल्यास उबदार कपड्यांच्या घर्षणामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.
advertisement
मॉइश्चरायझरने त्वचा हायड्रेट ठेवा
थंडीत त्वचेतील ओलावा झपाट्याने कमी होतो आणि त्यातून खाज, सुकट्या कड्या आणि लालसरपणा दिसू लागतो. त्यामुळे आंघोळीनंतर लगेच चांगली कोल्ड क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावणे अत्यंत आवश्यक असते. कपडे घालण्यापूर्वी त्वचा नीट हायड्रेट केली तर उबदार कपड्यांमुळे रॅशेस येण्याची शक्यता कमी होते. दिवसातून 2 वेळा क्रीम लावल्यास त्वचा मऊ, लवचिक आणि निरोगी राहते.
उबदार कपडे थेट घालू नका
वूल अलर्जी टाळण्याचा सर्वात सोपा नियम म्हणजे ऊनी कपडे थेट त्वचेवर न घालणे. आधी कॉटनचे इनरवेअर, टी-शर्ट किंवा लेगिंग्ज घालून त्वचा पूर्ण झाकावी आणि त्यावरच वूलन स्वेटर, जॅकेट किंवा शॉल वापरावा. कापसाचे कपडे त्वचा आणि ऊनी पदार्थ यांच्यात संरक्षण तयार करतात. यामुळे खाज, पुरळ किंवा इंफेक्शन होण्याची शक्यता कमी होते. उन्हात फिरताना येणारे घामाचे थेंब वूलन कपड्यांमुळे स्किनला त्रास देऊ शकतात. त्यामुळे आत कॉटनचे कापड असणे अत्यंत महत्त्वाचे असते.
हे सोपे उपाय अवलंबल्यास थंडीत ऊनी कपडे घातल्यावर होणारी खाज, लालसरपणा आणि अस्वस्थता मोठ्या प्रमाणावर कमी होते. त्यामुळे ऊबही मिळेल आणि त्वचाही निरोगी राहील. हे करून देखील तुच्या त्वचेला खाज येण्याची समस्या जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
