advertisement

Green Chicken Recipe : चवदार चविष्ट ग्रीन चिकन, हिरव्या मिरचीच्या पेस्ट पासून बनवा झटपट, बोट चाखून खाल, Video

Last Updated:

चिकनला हिरव्या मसाल्यांच्या पेस्टसोबत शिजवले जाते, ज्यामुळे त्याला एक वेगळी चव आणि सुगंध येतो.

+
ग्रीन

ग्रीन चिकन रेसिपी 

कल्याण : चिकन खाण्याची अनेकांना आवड असते. हिरव्या पेस्टपासून बनवलेली एक चवदार चिकन डिश आहे, जी रोटी किंवा भातासोबत खाल्ले जाते. हरियाली चिकन किंवा हिरवे चिकन म्हणूनही ओळखले जाते आणि याच्या अनेक पद्धती आहेत, जसे की हैदराबादी ग्रीन चिकन किंवा थाई ग्रीन करी. यात चिकनला हिरव्या मसाल्यांच्या पेस्टसोबत शिजवले जाते, ज्यामुळे त्याला एक वेगळी चव आणि सुगंध येतो. आज आपण हिरव्या मिरच्या पेस्ट पासून ग्रीन चिकन कसा बनवायचा बघणार आहोत.
ग्रीन चिकन साहित्य:
चिकन: अर्धा किलो (मध्यम आकाराचे तुकडे) आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस(आवश्यकतेनुसार), मीठ
हिरवी पेस्ट: भरपूर कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, आले, लसूण.
मसाल्यासाठी: कांदे, टोमॅटो (ऐच्छिक), लवंग, मिरी, वेलची, दालचिनी, तमालपत्र, धणे पावडर, हळद, गरम मसाला, तेल, मीठ.
advertisement
ग्रीन चिकन कृती:
हिरवी पेस्ट बनवा : कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट बनवा.
मसाला तयार करा : एका भांड्यात तेल गरम करून लवंग, मिरी, वेलची, दालचिनी, तमालपत्र घालून फोडणी करा. त्यात चिरलेला कांदा घालून परता. टोमॅटो घाला (वापरत असल्यास) आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
मसाले घाला: त्यात धणे पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
advertisement
चिकन शिजवा: मॅरीनेट केलेले चिकन मसाल्यात घालून चांगले परता.
पेस्ट घाला: तयार केलेली हिरवी पेस्ट घालून मिक्स करा.
शिजवा: थोडे पाणी घालून झाकण ठेवून चिकन पूर्ण शिजेपर्यंत (साधारण 15-20 मिनिटे) मंद आचेवर शिजवा.
सर्व्ह करा: गरमागरम रोटी, नान किंवा जिरा राईससोबत सर्व्ह करा.
टीप: तुम्ही यामध्ये काजू पेस्ट किंवा नारळाचे दूध वापरून ग्रेव्ही अधिक घट्ट आणि क्रीमी बनवू शकता
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Green Chicken Recipe : चवदार चविष्ट ग्रीन चिकन, हिरव्या मिरचीच्या पेस्ट पासून बनवा झटपट, बोट चाखून खाल, Video
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement