1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास? Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
डाकघर विभागाकडून दुर्मिळ अशा टपाल तिकिटांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनामध्ये अत्यंत दुर्मिळ अशी जी टपाल तिकीट आहेत, ती सर्वसामान्य नागरिक विशेष करून विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक वेगळे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शहरातील टीव्ही सेंटर परिसरामध्ये डाकघर विभागाकडून दुर्मिळ अशा टपाल तिकिटांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनामध्ये अत्यंत दुर्मिळ अशी जी टपाल तिकीट आहेत, ती सर्वसामान्य नागरिक विशेष करून विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
शहरामधील टीव्ही सेंटर परिसरामध्ये कैलाश शिल्प म्हणून एक सभागृह आहे. या ठिकाणी हे प्रदर्शन दोन दिवसांसाठी भरवण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी अगदी मोफत असणार आहे. विशेष करून शाळकरी मुलांसाठी हे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे. 1854 पासूनची सर्व टपाल तिकीट या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत.
advertisement
22 वर्षांची सेवा, पुणे मनपात दरारा असणारे शहर अभियंता प्रशांत वाघमारे सेवानिवृत्त, असा राहिला प्रवास
यामध्ये फ्रीडम फायटर, शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, त्यासोबतच देश-विदेशातील जी दुर्मिळ तिकीट आहेत, ती सर्व तिकीट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
advertisement
अतिशय दुर्मिळ असे हे प्रदर्शन आहे, तर जास्तीत जास्त पालकांनी, त्यासोबत शाळेने आपल्या मुलांना या ठिकाणी होणारे प्रदर्शन दाखवावे. जेणेकरून त्यांना याविषयी माहिती होईल. तसेच नेमके टपाल तिकीट काय असते हे देखील त्यांना माहिती पडेल. त्यांना सर्व गोष्टी माहिती होतील यासाठी आम्ही प्रदर्शन भरवलेले आहे, असे मुख्य पोस्ट मास्तर सुरेश बनसोडे म्हणाले आहेत.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 7:51 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास? Video








