TRENDING:

Kids Mental Health : तुमची मुलं 'हे' कार्टून तर पाहत नाही? डॉक्टर म्हणाले वेळीच करा बंद! नाहीतर होईल मेंदूवर परिणाम

Last Updated:

काही कार्टून्स आपल्या मुलांसाठी अजिबात चांगले नसतात. यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे कोकोमेलन. हे कार्टून सध्या लहान मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सगळ्यात जास्त ते पाहिलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लहान मुलांना मोबाईल किंवा टीव्ही पाहायला देणं हा आता बऱ्याच पालकांचा नाईलाज झाला आहे आणि त्यामुळं मुलांना त्याची सवयही लागते. बहुतांश लहान मुलं म्हणजेच 5 वर्षांपर्यंतची मुलं काही विशिष्ट कार्टून पाहतात. आपल्याकडे किंवा इतर देशांमध्येही हे कार्टून खूप प्रसिद्ध आहेत. पण प्रसिद्ध असले म्हणून ते आपल्या मुलांसाठी चांगले आहेत असं नाही.
मुलांना हे कार्टून अजिबात पाहू देऊ नका..
मुलांना हे कार्टून अजिबात पाहू देऊ नका..
advertisement

काही कार्टून्स आपल्या मुलांसाठी अजिबात चांगले नसतात. यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे कोकोमेलन. हे कार्टून सध्या लहान मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सगळ्यात जास्त ते पाहिलं जातं. पण खरं तर आपल्याला मुलांच्या मेंदूची या काळात वाढ होत असते आणि त्या काळात हे कार्टून मुलांच्या मेंदूवर चुकीचा परिणाम करू शकतं. याबद्दल यूकेमधील न्यूरोलॉजिस्ट आरिफ खान यांनी यूट्यूबवर सविस्तर माहिती दिली आहे.

advertisement

मुलांना हे कार्टून अजिबात पाहू देऊ नका..

कोकोमेलन : कोकोमेलन कार्टूनमध्ये गडद आणि भडक रंग वापरले जातात. शिवाय खूप फास्ट बदलणारी दृश्य आणि संगीत असतं. या सर्व गोष्टी लहान मुलांच्या मेंदूला अतिउत्तेजित करू शकतात. त्यामुळे मुलं बऱ्याचदा हायपरऍक्टिव्ह होतात. सतत वेगवान कन्टेन्ट पाहिल्यामुळे मुलांची एका जागी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. या कार्टूनचा मुलांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.

advertisement

सुपरकिटीज : कोकोमेलनप्रमाणेच हे कार्टूनदेखील मुलांना हायपरऍक्टिव्ह बनवू शकते. कारण यातही मोठा आवाज असलेले संगीत, भडक रंग आणि वेगाने बदलणारी ॲक्शन दृश्य असतात. जी मुलांना जास्त उत्तेजित करतात. या कार्टूनमध्ये सुपरपॉवर्स आणि मारामारी दाखवली जाते. मुलं खऱ्या आयुष्यात याची नक्कल करण्याचा प्रयत्न करू शकतात.

पेप्पा पिग : या कार्टूनमध्ये रंग आणि संगीत तसे जास्त उत्तेजक नाहीत. पण यातील मेन पेप्पाचं बोलणं बऱ्याचदा उद्धट किंवा हुकूमशहासारखा असल्यासारखं भासतं. लहान मुलांना चांगलं वाईट यातला फार फरक या वयात कळत नाही. म्हणून ते याचं अनुकरण करू शकतात. डॉक्टरांच्यामते, या कार्टूनमध्ये अनेकदा डॅडी पिग आणि मम्मी पिग यांना विनोदी दाखवलं जातं. त्यामुळे खऱ्या आयुष्यात कधीकधी मूळ पालकांना गांभीर्यांने घेत नाही.

advertisement

स्पंजबॉब स्क्वेअरपँट्स : या कार्टूनमध्ये विनोद खूप असतात, त्याचा पायाचा तो आहे. पण यामुळे लहान मुलांना कधीकधी बरोबर-चूक किंवा खरं-खोटं यातला फरक कळत नाही. त्यांचा गोंधळ होऊ शकतो. शिवाय काहीवेळा या कार्टूनमधील पात्रे ओरडतात, अतिप्रतिक्रिया देतात किंवा विचित्र वागतात. ज्यामुळे मुलं त्याचे अनुकरण करण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या मते, हे कार्टून मुलांना खिळवून धरते. त्यामुळे मुलं वारंवार आणि जास्तवेळ तेच पाहतात.

advertisement

कार्टूनचा मेंदूवर कसा होतो परिणाम?

या सर्व कार्टूनचा मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. मुलं चिडकी, हट्टी आणि रंगीत होऊ शकतात. ओरडणं, हट्ट करणं, वस्तू फेकणं अशा गोष्टीही मुलं बऱ्याचदा करतात. शिवाय या कार्टुन्सची सवय लागल्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढतो. साहजिकच याचा परिणाम त्यांचा मेंदू आणि डोळ्यांवरही होतो.

मुलांच्या वयाची पहिली 5 वर्ष त्यांचा मेंदू विकसित होत असतो. अशावेळी त्यांना चांगल्या गोष्टी दाखवाव्या. चांगला कन्टेन्ट निवडून मुलांना दाखवा किंवा त्यांचा स्क्रीन टाइम कमी करा, शक्य तितकं मुलांना वस्तूंमध्ये रमायला शिकवा, मैदानी खेळ खेळू द्या. यामुळे मुलांचा मेंदू पुढच्या सर्व गोष्टींसाठी चांगला तयार होतो आणि मुलं स्थिर, कणखर बनतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीच्या पगारात भागत नव्हता खर्च, तरुणाने सुरू केला तेल व्यवसाय, महिन्याला 4 लाखांची उलाढाल
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kids Mental Health : तुमची मुलं 'हे' कार्टून तर पाहत नाही? डॉक्टर म्हणाले वेळीच करा बंद! नाहीतर होईल मेंदूवर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल