धान्याला नाही लागणार किडे : जर पावसाळ्यात धान्याला किडे लागू नयेत असं वाटतं असेल तर टाईट कंटेनरमध्ये धान्य ठेवा, मग एका टिशूमध्ये आलं, लसूण, वेलची इत्यादी ठेऊन तांदळाच्या मधोमध ठेवा. यामुळे तांदळाला कीड लागत नाहीत.
केळ सडण्यापासून कसं रोखाल : पिकलेली केळी दोन ते तीन दिवसात काळी पडतात. तेव्हा सर्वप्रथम केळ पाण्याने धुवून घ्या आणि मग टिशू पेपरने साफ करा. एक टिशू पेपर ओला करून तो केळ्याच्या देठावर गुंडाळा यामुळे 2 आठवडा केळ खराब होणार नाही.
advertisement
कलिंगडाला नाही येणार दुर्गंधी : कलिंगड एकदा कापल्यावर पूर्ण संपवावा लागतो. जर तुम्ही कलिंगड अर्धा कापून ठेवलात तर दुसऱ्या दिवशी त्याला वास येऊ लागतो. तेव्हा कलिंगडाला दुर्गंधी येऊ द्यायची नसेल तर तुम्ही अर्ध्या कापलेल्या कलिंगडावर लसूण ठेवा आणि त्याला पानाने कव्हर करून घ्या. यामुळे कलिंगड लवकर खराब होणार नाही.
टोमॅटो सडणार नाही : उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात टोमॅटो लवकर सडतात. टोमॅटोला सडण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही टोमॅटोच देठ टेप लावून कव्हर करा. यामुळे टोमॅटोला मॉइश्चर पकडणार नाही आणि ते खूप दिवस फ्रेश राहतील.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)