Health Tips : 21 दिवस गोड पदार्थ खाल्ले नाही तर? शरीरात होतील असे बदल; पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Last Updated:

21 दिवस साखरयुक्त गोड पदार्थांचं सेवन न केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. तसेच यामुळे शरीरात आश्चर्यकारक बदल सुद्धा जाणवू शकतात.

21 दिवस गोड पदार्थ खाल्ले नाही तर? शरीरात होतील असे बदल; पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
21 दिवस गोड पदार्थ खाल्ले नाही तर? शरीरात होतील असे बदल; पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
गोड खाणं अनेक लोकांना आवडतं. काही लोक खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांचं सेवन करतात मात्र यामुळे तुमच्या आरोग्याला खूप नुकसान पोहोचू शकतं. तुम्हाला डायबेटिज सारखे आजार सुद्धा होऊ शकतात. सध्या सोशल मीडियावर एक चॅलेंज खूप जोर धरू लागलं आहे. ज्यात तब्बल 21 दिवस गोड पदार्थ खायचे नाहीत. 21 दिवस साखरयुक्त गोड पदार्थांचं सेवन न केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. तसेच यामुळे शरीरात आश्चर्यकारक बदल सुद्धा जाणवू शकतात.
वजन कमी होणे : जर तुम्ही 21 दिवस गोड खात नसाल तर लठ्ठपणा कमी होऊन तुमचं वजन देखील कमी होऊ शकतं. गोड पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
ग्लोइंग स्किन : गोड न खाल्ल्याने त्वचा खूप हेल्दी आणि ग्लोइंग बनते. जेव्हा तुम्ही गोड खाता तेव्हा तुमच्या शरीरातील साखर कोलेजन प्रोटीनला चिकटून राहते आणि हळूहळू कोलेजन नष्ट होऊ लागते. कोलेजन कमी झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होते आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
advertisement
दात होतील मजबूत : जर तुम्ही 21 दिवस गोड खाल्लं नाहीत तर तुमचे दात सुद्धा मजबूत होतील. जेव्हा तुम्ही गोड खाता तेव्हा तोंडात असणारे बॅक्टेरिया आणि साखर मिळवून ऍसिड बनते. ज्यामुळे दात सडतात. ज्यामुळे दातांमध्ये कॅविटी निर्माण होते.
advertisement
हार्ट अटॅक : गोड खाण टाळल्याने हृदयाच्या संबंधित समस्या निर्माण होतात. गोड खाल्ल्याने ट्राइग्लिसराइड लेव्हल वाढते आणि ज्यामुळे रक्त गोठू लागत ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : 21 दिवस गोड पदार्थ खाल्ले नाही तर? शरीरात होतील असे बदल; पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement