Knee Pain : ना औषध ना तेल, एकही रुपया खर्च न करता मिळेल गुडघेदुखीपासून आराम, फक्त 'हा' उपाय करा

Last Updated:

योग हा असा एक उपाय आहे जे नियमित केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. गुडघेदुखीवर योग हा फायदेशीर उपाय ठरू शकतो.

ना औषध ना तेल, एकही रुपया खर्च न करता मिळेल गुडघेदुखीपासून आराम
ना औषध ना तेल, एकही रुपया खर्च न करता मिळेल गुडघेदुखीपासून आराम
गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. वाढत वय, वाढतं वजन, दुखापत इत्यादी अनेक कारणांमुळे गुडघ्यांवर दबाव पडून तेथे सूज आणि वेदना होतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात औषध, तेल इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र यामुळे सर्वांनाच गुडघेदुखीपासून सुटका होईलच असं नाही. तेव्हा योग हा असा एक उपाय आहे जे नियमित केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. गुडघेदुखीवर योग हा फायदेशीर उपाय ठरू शकतो.
गुडघेदुखीसाठी उपयोगी ठरतात 4 आसन : 
त्रिकोणासन : त्रिकोनासन केल्याने गुडघ्याचे सांधे मजबूत होतात आणि लवचिकता वाढविण्यास मदत करते. या आसनामुळे पाय, कूल्हे आणि पाठीचा कणा देखील ताणला जातो ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.
वृक्षासन : वृक्षासन शरीराचं संतुलन आणि स्थिरतेत सुधार करण्यासाठी वृक्षासन उत्कृष्ट ठरते. हे गुडघ्याचे सांधे मजबूत करण्यास मदत करते.
advertisement
बालासन : बालासन हे एक विश्रामकारी आसन असून हा गुडघ्यावरील दबाव कमी करतो. हे आसन पाठ आणि कूल्हे सुद्धा स्ट्रेच करतो.
पादांगुष्ठासन : पदांगुस्थासनामुळे पाय आणि गुडघ्यांचे स्नायू मजबूत होतात. हे आसन शरीराचे संतुलन आणि लवचिकता देखील सुधारते.
advertisement
कोणताही नवा व्यायाम सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, खास करून जेव्हा तुम्हाला पूर्वी कोणतीही दुखापत झाली असेल. योग करत असताना शरीराला अतिप्रमाणात स्ट्रेच करू नका. शक्य असल्यास योग अभ्यासासाठी एखादा ट्रेनर अपॉईंट करा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली योग करा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Knee Pain : ना औषध ना तेल, एकही रुपया खर्च न करता मिळेल गुडघेदुखीपासून आराम, फक्त 'हा' उपाय करा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement