Skin Care Tips : पावसाळ्यात चेहरा सारखा होतो ऑयली? वापरा 5 प्रकारचे घरगुती स्क्रब, चेहऱ्यावर येईल ग्लो
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पावसाळ्यात त्वचेला ग्लॉइंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी स्क्रब उपयोगी ठरू शकतील. घरी कॉफीचा वापर करून तुम्ही काही स्क्रब तयार करू शकता.
पावसाळ्यात त्वचेच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्वचा अधिक ऑयली होते आणि पिंपल्सची समस्या वाढू लागते. तेव्हा पावसाळ्यात त्वचेला ग्लॉइंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी स्क्रब उपयोगी ठरू शकतील. घरी कॉफीचा वापर करून तुम्ही काही स्क्रब तयार करू शकता.
कॉफी त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते, कॉफीच्या वापराने त्वचा चमकदार आणि ग्लोइंग बनते. तुम्हाला कॉफी पासून बनणाऱ्या 5 स्क्रब बद्दल सांगणार आहोत, यातील कोणताही एक स्क्रब आठवड्यात दोन ते तीन वेळा वापरून पावसाळ्यात त्वचे संबंधित समस्यांपासून दूर राहू शकता.
नारळाचे तेल आणि कॉफी : एका वाटीत नारळाचे तेल आणि त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि त्याला सर्कल मोशनमध्ये मसाज करा. 10 मिनिटानंतर चेहरा गरम पाण्याने धुवा यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि त्वचेवर इन्स्टंट ग्लो येईल. जर तुमची त्वचा हे ऑयली असेल तर त्यावर नारळाचे तेल लावण्यापासून वाचा.
advertisement
मध आणि कॉफी : एका वाटीत तीन चमचे मध घ्या आणि त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स करा. हे मिश्रण चेहेऱ्यावर लावा आणि हळूहळू स्क्रब करा. 5 ते 10 मिनिटे स्क्रब ठेऊन मग गरम पाण्याने धुवून घ्या. यामुळे पिंपल्स येण्याची समस्या सुद्धा दूर होते.
advertisement
दही आणि कॉफी : एका वाटीत एक चमचा दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर टाकून मिक्स करा. आता हे मिश्रण चेहेरा आणि गळ्यावर लावा. हे मिश्रण डोळ्यांच्या जवळपास लावू नये. 15 मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करा आणि मग थंड पाण्याने धुवा यामुळे त्वचेवर ग्लो येईल.
कॉफी आणि ऑलिव ऑईल : एका वाटीत अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा कॉफी पावडर तर दोन ते तीन थेंब ऑलिव ऑईल मिक्स करा. मग हे मिश्रण त्वचेवर लावा आणि 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 5 मिनिटे लावून ठेवा, मग चेहरा गरम पाण्याने धुवा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल.
advertisement
लिंबूचा रस आणि कॉफी : जर चेहऱ्यावर काळे डाग वाढले तर १ वाटीत एक चमचा लिंबूचा रस आणि अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स करा. १० मिनिटं हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवा आणि मग हलक्या हाताने मसाज करा. नंतर थंड पाण्याने धुवून टाका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2024 3:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care Tips : पावसाळ्यात चेहरा सारखा होतो ऑयली? वापरा 5 प्रकारचे घरगुती स्क्रब, चेहऱ्यावर येईल ग्लो