काही लोकांना स्वयंपाक करायला आवडतं तर काहींना बिलकुल आवडत नाही पण तरी करावं लागतं. स्वयंपाक म्हटलं की त्यात बराच वेळ जातो. पण झटपट स्वयंपाक करण्यासाठी बऱ्याच ट्रिक्स आणि टिप्स आहेत. अशीच ही ट्रिक आहे ती औषधांच्या बाटलीच्या झाकणाची. औषधांच्या बाटलीच्या झाकणाचा किचनमध्ये वापर होऊ शकतो, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आता नेमकं काय करायचं ते पाहुयात.
advertisement
Kitchen Jugaad Video : चमच्याची कमाल! किलोभर लसूण सोला फक्त 5 मिनिटात, जादुई पद्धत नक्की पाहा
किचनमध्ये भांडी वापरली जातात त्यांची झाकणं असतात. जेव्हा आपण गॅसवर भांड असताना त्यावर हे झाकण ठेवतो तेव्हा हे झाकणही गरम होतं आणि आपण उचलायला जातो तेव्हा हाताला चटका लागतो. काही झाकणांचा वर धरण्यासाठी होल्डर असतं. पण काहींना नसतं किंवा ते तुटलेलं असतं, निघालेलं असतं. अशावेळी तुम्हाला औषधांच्या बाटल्यांचा झाकणाचा उपयोग होईल. हे झाकण तुम्ही बाटल्यांच्या झाकणावर लावा. तुम्हाला ते झाकण धरण्यासाठी होल्डर तयार झालं.
Kitchen Jugaad Video : किचनमधील भांडी ठेवा फक्त एका बाटलीत
@praju_vlog_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीने फक्त माहितीसाठी दिला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)