TRENDING:

Skin care tips for winter: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची अशी घ्या काळजी, हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे, त्वचा होईल तजेलदार आणि मुलायम

Last Updated:

Skin care tips for winter हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे आजारी पडू नये म्हणून आपल्या शरीराची काळजी घेतो. त्वचेची काळजी घ्यायला हवी.थंडीत जर त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही त्वचा विविध त्वचारोगांचा सामना करावा लागू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Skin care tips for winter: हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे आजारी पडू नये म्हणून आपल्या शरीराची काळजी घेतो. मात्र त्वचेची काळजी घेण्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. किंबहुना हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं हे महिला किंवा मुलीचं काम आहे असं पुरूषांना वाटतं. त्यामुळे अनेकदा पुरूषांकडून त्वचेची हवी तशी काळजी घेतली जात ही, ज्याचं रूपांतर त्वचा कोरडी पडणे, त्वचेला भेगा पडणे, कालांतराने त्यातून रक्त येणं आणि दुसऱ्या गंभीर त्वचा विकारांमध्ये होऊ शकतं.
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी
advertisement

बेसनपीठाचा वापर

बेसनपीठाच्या भजी जशा जिभेचे चोचले पुरवायला सक्षम असतात, त्याच पद्धतीने बेसनपीठ तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकतं. बेसनपीठामुळे डेडस्किन काढून टाकायला मदत तर होतेच होते मात्र त्यासोबत त्वचेचा रंगही उजळतो.

'Winter Skin Care : थंडीच्या दिवसात अशी घ्या त्वचेची काळजी, घरगुती उपाय नक्की करुन बघा'

त्वचा कोरडी पडू देऊ नका

advertisement

ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे त्यांनी दुधाची  साय, तूप किंवा थोडंसं खोबरेल तेल घेऊन ते हातापायांना चोळावं. यामुळे तेल किंवा तूप शरीरात शोषले जाऊन त्वचा मुलायम आणि तजेलदार राहते. तुम्ही मॉइश्चरायझरही वापरू शकता. मात्र हे करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पाणी अधिक असलेल्या म्हणजे वॉटर बेस मॉइश्चरायझरचा वापर करा. उद्या एलोवेरा जेल कोरफडीपासून बनवलेलं मॉइश्चरायझर. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला ऑईल बेस मॉइश्चरायझरचा वापर करण्याचा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ देतात. जर तुमची त्वचा नॉर्मल म्हणजे दोन्ही प्रकारातली असेल तुम्ही आलटून पालटून दोन्ही प्रकारचे मॉइश्चरायजर  वापरू शकता. त्वचेचा प्रकार न ओळखता मॉइश्चरायजर वापरल्यास त्वचेला नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे पूर्ण चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. त्वचा काळी पडते. योग्य मॉइश्चरायजरचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टर देतात.

advertisement

सनस्क्रीन लोशन

लोकांना वाटतं  की, सनस्क्रीन लोशनचा वापर फक्त उन्हाळ्यात त्वचा टॅन न होण्यासाठी करायचा असतो. मात्र तसं नाहीये. हिवाळ्यातही सनस्क्रीनचा नियमित वापर केल्यामुळे वाढलेल्या प्रदूषणापासून त्वचेचं रक्षण होतं.

'हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? लिंबू, गुलाबजल वापरावं का? डॉक्टरांचा सल्ला'

जास्त गरण पाण्याने अंघोळ नको

थंडीमुळे अंघोळ करताना आपण पाणी नेहमीपेक्षा थोडं जास्त गरम किंवा कडक घेतो. मात्र अतीगरम पाण्यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची भीती असते. यामुळे त्वचा कोरडी  होऊन होऊन खाज सुटते.कधी कधी अंगावर रॅशेस सुद्धा येतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin care tips for winter: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची अशी घ्या काळजी, हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे, त्वचा होईल तजेलदार आणि मुलायम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल