TRENDING:

लॉकडाउनमध्ये जन्मलेल्या मुलांची कशी असेल इम्यूनिटी सिस्टीम? रिसर्चमध्ये समोर आली अशी गोष्ट ऐकून वाटेल आश्चर्य

Last Updated:

एका संशोधनानुसार, यासंबंधी धक्कादायक खुलासा झाला आहे. याबद्दल ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कोविड-19 च्या काळात अनेकांनी आपला जीव गमावला, अनेकांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे. याकाळानंतर लोकांना हळूहळू त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले. लोकांना श्वासनाशी संबंधीत आजार देखील उद्भवू लागले आहेत. याच काळात अनेक बाळांचा जन्म झाला आहे. अशावेळी एक प्रश्न उपस्थीत होतो की या बाळांची रोगप्रतिकारक शक्ती कशी असेल?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

एका संशोधनानुसार, यासंबंधी धक्कादायक खुलासा झाला आहे. लॉकडाउनमध्ये जन्म घेणाऱ्या बाळांमध्ये आजारीपणाची शक्यता अत्यंत कमी आहे आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता इतर काळात जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत अधिक मजबूत दिसते.

आयरलंड यूनिवर्सिटी कॉलेज कॉर्कच्या संशोधकांचे मत आहे की, लॉकडाउनच्या काळात जन्मलेल्या बाळांचे पोटातील मायक्रोबायोम इतर बाळांपेक्षा खूपच वेगळे आहेत. या फरकामुळे या बाळांमध्ये एलर्जीच्या समस्या तुलनेने फारच कमी आढळतात.

advertisement

NIH च्या मते, निरोगी आंत मायक्रोबायोटा अन्नातील अपरिपचनीय घटकांच्या चयापचयातून ऊर्जा मिळवणे, संसर्गांपासून संरक्षण आणि रोगप्रतिकारक प्रणालीचे मॉड्युलेशन यांसारख्या अनेक सकारात्मक कामांसाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

या स्टडीत असेही नमूद करण्यात आले आहे की, कोविड काळात जन्मलेल्या बाळांपैकी फक्त 5% मध्ये एलर्जीच्या समस्या दिसल्या, तर यापूर्वीचा हा आकडा 22.8% पर्यंत गेला होता. त्याचप्रमाणे, या बाळांना फक्त 17% मुलांना एका वर्षात अँटीबायोटिक्स लागली, तर यापूर्वीची दरवाढ 80% इतकी होती.

advertisement

लॉकडाउनमुळे होणारा प्रदूषणाचा कमी परिणाम हाच या बाळांच्या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा मुख्य घटक मानला जात आहे. शांत वातावरणामुळे आणि कमी हवेतील प्रदूषकांच्या अभावामुळे बाळांच्या फुफ्फुसांमध्ये वायू स्वच्छ राहिला आणि त्यांना नैसर्गिक अँटीबायोटिकप्रमाणेच संरक्षण मिळाले.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लॉकडाउनमध्ये जन्मलेल्या मुलांची कशी असेल इम्यूनिटी सिस्टीम? रिसर्चमध्ये समोर आली अशी गोष्ट ऐकून वाटेल आश्चर्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल