जगातला सगळ्यात लांब रेल्वे प्रवास पूर्ण करायचा तर सात दिवस लागतात. रशियातल्या मॉस्को या शहरापासून ब्लादिवोस्तोक या शहरापर्यंत ही रेल्वे जाते. एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास करणारी जगातली ही पहिली रेल्वे आहे. हा पल्ला कापताना ती तीन देशांतील आणि थोड्याथोडक्या नव्हे तर सब्बल 86 शहरांमधून जाते. ‘ट्रान्स सायबेरियन ट्रेन’ म्हणून ही रेल्वे जगभरात ओळखली जाते. ती 10,214 किलोमीटरचं अंतर कापते. हे अंतर कापण्यासाठी ती 7 दिवस 20 तास 25 मिनिटांचा वेळ घेते. या प्रवासात ती 16 नद्यांची पात्रंही ओलांडते. हा रेल्वे प्रवास प्रवाशांना अनेक प्रकारच्या भूभागांतून घेऊन जातो. त्यामुळेच या प्रवासात कित्येक वेळा श्वास रोखून धरावे असे प्रसंगही प्रवाशांच्या वाट्याला येतात. दुसरीकडे डोळ्यांचं पारण फेडणारं निसर्गसौंदर्यही प्रवाशांना अनुभवायला मिळतं.
advertisement
Winter Tips : हिवाळ्यात प्या गरमागरम गुळाचा चहा, आरोग्याच्या 8 समस्या होतील दूर
ट्रेनचा इतिहास :
ट्रान्स सायबेरियन रेल्वे 1916 मध्ये सुरु झाली. रशियातल्या मॉस्कोपासून ते ब्लादिवोस्तोकपर्यंत ही रेल्वे प्रवास करते. जगातला हा दुसरा सर्वांत लांब लोहमार्ग आहे. जंगल आणि पर्वतराजीतून ही रेल्वे प्रवास करते. रशियातल्या सायबेरिया या प्रांतात लोकवस्ती वाढवण्यात आणि त्या प्रांताचा सर्वांगीण विकास करण्यात या रेल्वेमार्गाचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे.
या देशांतून प्रवास :
ही ट्रेन सात दिवसांच्या सफरीत प्रवाशांना तीन देशांचा प्रवास घडवते हे आम्ही तुम्हाला सांगितलंच. ब्लादिवोस्तोक, उलानबातर आणि बीजिंगमधून ही रेल्वे जाते. या मार्गावर 18 स्टेशन्स लागतात. इतर कुठल्याही रेल्वे प्रवासासारखंच या प्रवासातही आपल्याला कुठे उतरायचंय त्याचं बुकिंग आधीच करणं आवश्यक ठरतं. रेल्वे मार्गाप्रमाणे व्हिसाची प्रक्रियाही अर्थातच पूर्ण करावी लागते. रशियातून चीनपर्यंत जायचं असेल तर दोन्ही देशांचा व्हिसा प्रवाशांकडे असणं आवश्यक आहे.