पवना लेक कॅम्पिंग
पुण्यापासून फक्त 60–70 किमी अंतरावर असलेला पवना लेक हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध लेकसाईड कॅम्पिंग स्पॉट आहे. पवना धरण आणि तुंग, तिकोना, लोहगड किल्ल्यांच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये वसलेले हे ठिकाण शांतता, स्वच्छ पाणी आणि थंड वाऱ्यांसाठी ओळखले जाते. येथे तंबू, BBQ, बोनफायर, म्युझिक नाईट, कयाकिंग आणि नेचर वॉकचा आनंद घेता येतो. नवीन वर्षाच्या रात्री इथली लाईटिंग आणि लेकच्या पार्श्वभूमीवरचा सनराईज जादुई वाटतो.
advertisement
भंडारदरा लेक कॅम्पिंग
मुंबईपासून सुमारे 165 किमी आणि पुण्यापासून 175 किमी अंतरावर असलेले भंडारदरा हे शांत आणि सुंदर ठिकाण आहे. आर्थर लेकच्या काठावरचे ओव्हरनाईट कॅम्पिंग हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. येथील धुक्याचे वातावरण, शांत सरोवर आणि पर्वतरांगांचा संगम रात्री अधिक मोहक बनवतो. वर्षाच्या शेवटच्या रात्री निसर्गाच्या शांत मिठीत वेळ घालवण्यास हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.
अलिबाग कॅम्पिंग
अलिबाग बीच कॅम्पिंग हे मुंबईजवळील सर्वात लोकप्रिय आणि रोमँटिक कॅम्पिंग अनुभवांपैकी एक मानले जाते. स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी मऊ वाळू, लाटांचा मंद आवाज आणि सूर्यास्ताची अप्रतिम शोभा यामुळे येथे कॅम्पिंग करणे एक वेगळाच आनंद देतं. रात्रीच्या वेळी समुद्राच्या लाटांसोबत बोनफायर, लाईव्ह म्युझिक, बार्बेक्यू आणि तारांकित आकाशाखाली बसून गप्पा मारण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. मित्रांसोबत, कुटुंबासोबत किंवा कपल्ससाठीही अलिबाग बीच कॅम्पिंग हा एक परफेक्ट वीकेंड गेटवे आहे.
वर्साई लेक कॅम्पिंग लोणावळा
लोणावळ्याच्या हिरवाईमध्ये वसलेले हे लेकसाईड ठिकाण ओव्हरनाईट कॅम्पिंगसाठी एकदम परफेक्ट आहे. इथून दिसणारे टेकड्यांचे दृश्य, धुक्यात हरवलेले वातावरण, आणि शांत सरोवराचा नजारा तुमचा नवीन वर्षाचा उत्सव संस्मरणीय बनवतो. Adventure Activities, Music, Bonfire यामुळे तरुणांमध्ये याची लोकप्रियता जास्त आहे.
कोलाड नदीकिनारी कॅम्पिंग
कोलाड हे नदी राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असले तरी येथे नदी आणि तलाव काठावर कॅम्पिंगची उत्तम व्यवस्था आहे. कोलाडच्या लेकसाईड परिसरात स्वच्छ पाणी, हिरवीगार निसर्गदृश्ये आणि रोमांचक अॅक्टिव्हिटीज मिळतात. न्यू इयरच्या सायंकाळी येथे म्युझिक, बोनफायर आणि Adventure sports चा धमाल अनुभव मिळतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
