या पद्धतीने करा घराचे डेकोरेशन..
- घराच्या प्रवेशद्वारापासूनच सजावटीला सुरुवात करा. दारावर आंब्याची पानं-फुलांचे तोरण लावा. तुम्ही रेडिमेड तोरणही लावू शकता. मात्र मॅरिगोल्ड किंवा शेवंतीची फुलं वापरल्यास पारंपरिक लूक मिळतो. दारासमोर रंगीबेरंगी रांगोळी काढून त्यात पतंग, ऊस, तिळगूळ किंवा सूर्यदेवाची चिन्हं काढल्यास संक्रांतीचा उत्साह अधिक वाढतो.
- हळदी कुंकू ठेवायच्या जागेची सजावट खास असायला हवी. पाटावर सुंदर रंगीत कपडा, शॉल किंवा ओढणी टाका. त्यावर तांब्याचा करंडा, त्यात हळद-कुंकू आणि फुलांची सजावट करा. आजूबाजूला लहान पणत्या, मेणबत्त्या किंवा नाजूक LED लायटिंग लावल्यास जागा अधिक सुंदर दिसते.
advertisement
- बैठकीच्या खोलीत फुलांचे हार, कागदी कंदील किंवा फॅब्रिक डेकोरेशन वापरता येईल. भिंतींवर पारंपरिक वॉल हँगिंग, वारली किंवा मधुबनी पेंटिंग्स लावल्यास महाराष्ट्रीयन संस्कृतीचं सुंदर दर्शन घडतं. हलक्या रंगांच्या पडद्यांमुळे घरात उजळपणा येतो.
- टेबल किंवा कोपऱ्यांमध्ये पितळी किंवा तांब्याची भांडी, त्यात फुलं, ऊसाचे तुकडे किंवा तिळाचे लाडू ठेवून सजावट करता येते. लहान टोपल्या, करंडे किंवा मातीची भांडी वापरून वाण ठेवण्याची जागा सजवली तर ती अधिक आकर्षक दिसते.
- लायटिंगकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळी हळदी-कुंकू असेल तर मऊ पिवळ्या प्रकाशाची लायटिंग, पणत्या किंवा कंदील घरात उबदार वातावरण निर्माण करतात. खिडक्यांजवळ किंवा बाल्कनीत दिवे लावल्यास घर अधिक प्रसन्न दिसतं.
शेवटी, संपूर्ण सजावट करताना साधेपणा आणि पारंपरिकतेचा समतोल ठेवा. जास्त सजावट करण्यापेक्षा योग्य रंगसंगती, फुलं, दिवे आणि पारंपरिक वस्तू यांचा वापर केल्यास हळदी-कुंकू कार्यक्रम संस्मरणीय होतो. अशा सजावटीमुळे पाहुण्यांना आपुलकीची भावना मिळते आणि संक्रांतीचा आनंद द्विगुणित होतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
