जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या लहानशा गावात प्रभू राहतो. निमुळत्या गल्लीत दहा बाय दहाची खोली हे त्यांचं घर आहे. घरात आई, वडील, प्रभू आणि त्यांचा 15 वर्षांचा लहान भाऊ सुरज एवढंच कुटुंब. त्यांना एक बहीण असून तिचं लग्न झालं आहे. लहान भाऊ सुरज देखील थॅलेसेमियाग्रस्त आहे.
संभाजीनगर हादरलं! सकाळी शेतात गेला, तो परतालच नाही, माजी सरपंचाच्या मुलासोबत संक्रांतीलाच भयंकर घडलं
advertisement
उपचारासाठी हवेत 50 लाख
“आम्ही दोघं मोबाईलवर व्हीडिओ बनवतो. लोकांना ते आवडतात. आम्हाला थॅलेसेमिया हा आजार आहे. त्यासाठी उपचारांचा खर्च जास्त आहे. एका इंजेक्शनला 25 लाख रुपये लागणार आहेत. दोघांसाठी 50 लाखांची गरज आहे. पण आता तो बिग बॉसमध्ये गेला आहे. आमच्यासाठी एक घर बांधायचं आणि उपचार करायचे, असं त्याचं ध्येय आहे. तो बिग बॉस नक्की जिंकून येईल. त्याचं स्वप्न साकार होईल,” असं सूरज सांगतो.
अचानक चक्कर आली अन्...
“आम्ही ऊसतोडीला बाहेर गावी होतो. तेव्हा प्रभूला अचानक चक्कर आली अन तो खाली पडला. अनेक ठिकाणी उपचार घेतले तरी फरक जाणवला नाही. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात थॅलेसेमियाचं निदान झालं. वाट्याला आलेली 2 एकर शेतजमीन पोरांच्या इलाजासाठी विकली. 47 वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदा पोरांचा एवढा अभिमान वाटला,” असं प्रभूचे वडील अशोक शेळके आवंढा गिळत अन् डोळ्यातलं अश्रू पुसत सांगत होते.
...तर आमचं नशीब पालटेल
आई सुनिता सांगतात की, “त्यांच्यासाठी खूप केलं. तो तिकडे असताना पण आमची काळजी करतो. माझी काही काळजी करू नकोस. बाकीचे लोक माझी काळजी घेतील. तुम्ही तुमची काळजी घ्या. कुणापुढही हात पसरवू नका.” पोरगं बिग बॉस जिंकलं तर आमचं नशीब पालटेल. मरीआईच्या कृपेने चांगलंच होईल, अशी भावना प्रभूची आई सुनिता व्यक्त करतात.





