रवा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
बारीक रवा- अर्धा किलो (4 वाट्या)
साजूक तूप - 150 ग्रॅम (1 वाटी)
साखर - 300 ग्रॅम (2 वाट्या)
वेलची - 8 नग
बदामाचे काप - सजावटीसाठी/आवश्यकतेनुसार
रवा लाडू बनवण्याची कृती..
- एका जाड बुडाच्या कढईत अर्धा किलो बारीक रवा घ्या. रवा भाजायला घ्या. 5-10 मिनिटांनंतर या स्टेजला लागणाऱ्या एक वाटी तुपापैकी निम्मे तूप (अंदाजे 75 ग्रॅम) घाला.
advertisement
- रवा मंद आचेवरच भाजावा. रवा कच्चा राहता कामा नये, त्याला छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्या.
- आता गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवून हा रवा 10 मिनिटे असाच ठेवा. यामुळे रवा व्यवस्थित थंड होईल.
- आता 300 ग्रॅम (दोन वाट्या) साखर घ्या. यामध्ये 8 वेलची घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घ्या.
- ही तयार झालेली पिठी साखर एका मोठ्या ताटात किंवा परातीत काढून घ्या.
- भाजलेला रवादेखील आता थंड झाला असेल. हा रवादेखील मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा आहे. (हा लाडू खुसखुशीत आणि गोल होण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे).
- यानंतर जे अर्धी वाटी तूप शिल्लक होते, ते गरम करा. त्यामध्ये बदामाचे काप मस्तपैकी फ्राय करून घ्या. हे तूप आणि बदामाचे काप थंड झाल्यानंतर मग बारीक केलेल्या रव्यावर आणि साखरेवर घालायचे आहे.
- आता साखर, रवा आणि तूप-बदामाचे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करा. म्हणजे तूप आणि साखर रव्यामध्ये एकजीव होईल.
- मिश्रण एकजीव झाल्यानंतर लगेचच त्याचे मस्त गोल गरगरीत असे लाडू वळून घ्या.
- एवढ्या प्रमाणात साधारण 23 लाडू तयार होतात.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
