पावसाळ्यात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे किचन स्वच्छ ठेवा. दररोज झाडून काढा आणि किचनची फरशी पुसा. भांडी धुतल्यानंतर ती चांगली वाळू द्या. ओल्या भांड्यांमध्ये जंतू लवकर होतात. तसेच आठवड्यातून एकदा फ्रीज स्वच्छ करा. जुने किंवा कुजलेलं अन्न किचनमध्ये असेल तर ते लगेच फेकून द्या.
- अन्न नेहमी झाकून ठेवा. अन्न उघडं ठेवल्याने माशा आणि किडे येऊ शकतात. उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवा. दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवलेलं अन्न खाऊ नका. खाण्यापूर्वी ते चांगलं गरम करा.
advertisement
- भाज्या आणि फळं मीठ किंवा व्हिनेगरच्या पाण्यात धुणं जास्त चांगलं. कच्च्या भाज्या चिरण्यासाठी वेगळी सुरी आणि बोर्ड वापरा.
- किचनमध्ये पाणी साचू देऊ नका. नाले आणि सिंक स्वच्छ ठेवा. कुठेही पाणी गळत आहे का, ते तपासून घ्या. कीटक ओलसर ठिकाणी लवकर येतात.
- हातांची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर हात धुवा. साबणाने किमान 20 सेकंद हात धुवा.
- पिण्याचे पाणी नेहमी उकळून किंवा फिल्टर करून प्या. बाहेरचं जास्त खाऊ नका. घरी शिजवलेलं ताजं अन्न खाणं पावसाळ्यात चांगलं असतं.
- किडे, मुंगळे घरात येऊ देऊ नका. दारं आणि खिडक्यांवर जाळी लावा. किचनमध्ये कीटकनाशक स्प्रेचा वापर करा. स्प्रे थेट अन्न किंवा भांड्यांवर पडणार नाही, याकडे लक्ष ठेवा.
- जर तुम्हाला किचनमध्ये कुठेही बुरशी लागलेली दिसली तर ती लगेच साफ करा. सर्वात आधी कोरड्या कापडाने बुरशीची जागा पुसून टाका, नंतर व्हिनेगर किंवा ब्लिचने स्वच्छ करा.
- पाकिटबंद अन्नाची एक्सपायरी डेट तपासा. जुने किंवा खराब झालेलं अन्न लगेच फेकून द्या. शंका असल्यास खाऊ नका.
- या गोष्टी लक्षात ठेवल्यास पावसाळ्यातही तुम्ही निरोगी राहू शकता.