जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये या बाबत एक रिसर्च प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये अशा पुरुषांचा समावेश होता जे लैंगिक संबंध ठेवत होते. लैंगिक रोग टाळण्यासाठी हे पुरुष दररोज माउथवॉशचा वापर करणारे होते. बेल्जियममधील अँटवर्प येथील इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनच्या (आयटीएम) रिसर्च टीमनं सांगितलं की, अल्कोहोल-बेस्ड माउथवॉशचा तीन महिने सलग वापर केल्याने या पुरुषांच्या तोंडात फ्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम आणि स्ट्रेप्टोकोकस अँजिनोसस या दोन प्रकारच्या जीवाणूंचं प्रमाण वाढलं.
advertisement
हे दोन्ही जीवाणू हिरड्यांशी संबंधित समस्या वाढवतात. त्यांच्यामुळे इसोफिजिअल आणि कोलोरेक्टल कॅन्सरही होऊ शकतो. याशिवाय, ॲक्टिनोबॅक्टेरिया नावाच्या बॅक्टेरियाच्या गटातही घट झाल्याचं संशोधकांच्या निदर्शनास आलं. ॲक्टिनोबॅक्टेरिया ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात.
आयटीएममधील सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन युनिटमधील डॉ. जोलेन लॉमन म्हणाल्या, "अल्कोहोलचा समावेश असलेले माउथवॉश आजकाल बाजारात सहज उपलब्ध होतात. सामान्य लोक श्वासाच्या दुर्गंधीशी सामना करण्यासाठी किंवा पिरियॉडॉन्टायटीस टाळण्यासाठी दररोज याचा वापर करतात. पण, माउथवॉशचे तोटे माहिती करून घेतले पाहिजेत. हेल्थ केअर प्रोफेशनल्सच्या मार्गदर्शनाने त्यांचा वापर केला पाहिजे."
आजकाल आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी फार बदलल्या आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासोबत दातांचीही हानी होत आहे. अनेकांना तोंडाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या समस्या नाहीशा करण्यासाठी माउथवॉश किंवा विविध टूथपेस्ट वापरण्याऐवजी घरी तयार केलेली आयुर्वेदिक टूथ पावडर उपयुक्त ठरू शकते.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आयुर्वेदिक टूथ पावडर तयार करण्यासाठी एक चमचा रॉक सॉल्ट, एक चमचा लवंग पावडर, एक चमचा दालचिनी पावडर, एक चमचा ज्येष्ठमध पावडर, कडुलिंबाची सुकलेली पानं आणि पुदिन्याची पानं इत्यादी सामग्री गरजेची असते. या सर्व गोष्टी वेगळ्या-वेगळ्या बारीक करून नंतर एका भांड्यात एकत्र कराव्यात आणि त्याचा दंतमंजन म्हणून वापर करावा.
