आरपी सेंटरमधील ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट प्रोफेसर रोहित सक्सेना म्हणाले, "अनेक अभ्यासांतून असं निदर्शनास आलं आहे की, 2050 पर्यंत जगातील 50 टक्के लोक डोळ्यांच्या आजाराने किंवा दृष्टीदोषाने त्रस्त असतील. हे सर्व लोक पॉवरचा चष्मा लावल्याशिवाय स्पष्ट बघूच शकणार नाहीत. सध्याची स्थिती देखील फारशी चांगली नाही."
चीन आणि जपानसारख्या पूर्व आशियातील देशांमध्ये 5 ते 15 वर्षे वयोगटातील 80 ते 90 टक्के मुलांना मायोपियाची (Myopia) समस्या आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, 50 पटसंख्या असलेल्या वर्गातील सुमारे 45 मुलांना पॉवरचा चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही. आजपासून सुमारे 30 ते 40 वर्षांपूर्वी फक्त पाच मुलं चष्मा वापरत होती. सध्यस्थिती बघता काही काळानंतर भारतातही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे.
advertisement
एक-दोन नव्हे 200 पेक्षा अधिक आजार दूर राहतील; आठवड्यातून फक्त एकदाच करा हे काम
आरपी सेंटरमधील कम्युनिटी ऑप्थॅल्मॉलॉजीचे प्रोफेसर डॉ. प्रवीण वशिष्ठ आणि त्यांच्या टीमने केलेल्या अनेक सर्वेक्षणातून असं निदर्शनास आलं की, मुलांमध्ये दृष्टीदोष वाढत आहेत. विशेषत: दिल्लीच्या आसपासच्या शहरी भागांतील सुमारे 20 टक्के मुलं आधीच चष्मा वापरत आहेत.
सर्वात मोठी समस्या अशी आहे की, अनेकदा मुलांना हे देखील समजत नाही की त्यांची दृष्टी अंधुक झाली आहे आणि त्यांना चष्म्याची गरज आहे. त्यामुळे ते अभ्यासात किंवा खेळातही चांगली कामगिरी करू शकत नाहीत. पालक आणि शिक्षकांना असं वाटतं की, मूलाचा बुध्यांक कमी आहे किंवा ते लक्ष केंद्रीत करू शकत नाही. वास्तविकता अशी असते की, मुलाला वर्गातील बोर्ड अजिबात दिसत नसतो. अशी समस्या जाणवत असल्यास मुलांचे डोळे तपासणं गरजेचं आहे.
डॉ. प्रवीण वशिष्ठ म्हणाले, "आजकालची मुलं फार कमी वयात टॅब्लेट आणि फोन वापरत आहेत. त्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वं देखील आली आहेत. आम्ही पालकांना सतत समजावून सांगत आहोत की, दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला स्मार्टफोन देऊ नये. जर आठ वर्षांपेक्षा कमी वयाचं मूल असेल तर तुम्ही त्याला बोलण्यासाठी स्मार्टफोनऐवजी साधा फोन देऊ शकता."
स्क्रीनचा किमान आकार किती असावा?
डॉ. सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही मुलाला स्क्रीन दाखवली तर त्या स्क्रीनचा किमान आकार तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप इतका असला पाहिजे. यापेक्षा लहान स्क्रीनमुळे डोळ्यांचं खूप नुकसान होतं. लहान मुलं किती वेळ आणि किती स्क्रीन वापरतात हा एक मोठा रिस्क फॅक्टर आहे.
सर्वात कमी वयात होणारा लाईफस्टाईल डिसीज
स्क्रीन वापराबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली आहेत. त्यामध्ये स्क्रीन टाइम कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नेत्रतज्ज्ञांच्या मते, मायोपिया हा लाइफस्टाईल डिसीज आहे आणि तो सर्वात कमी वयात होतो. लाइफस्टाईल सुधारली आणि सवयी बदलल्या तर खूप फायदा होईल.
दिल्लीमध्ये झाला अभ्यास
काही दिवसांपूर्वी आरपी सेंटरने दिल्लीतील सुमारे 10 हजार मुलांवर एक अभ्यास केला होता. यासाठी 2001 मध्ये अशाच प्रकारचा अभ्यास करण्यात आलेल्या क्षेत्राची निवड करण्यात आली होती. 2001 मध्ये सात टक्के मुलांमध्ये मायोपिया आढळला होता. तर 2013 ते 2016 दरम्यान केलेल्या अभ्यासानुसार, मायोपियाचं प्रमाण सुमारे 21 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. इतकेच नाही तर ग्रामीण भागातही मायोपियाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचं अनेक सर्वेक्षण आणि अहवालांच्या विश्लेषणातून समोर आलं आहे.
मुल रडत असल्यास मोबाईल देऊ नका
प्रोफेसर राधिका टंडन म्हणाल्या की, जेव्हा मूल रडतं किंवा पालकांना त्रास देतं तेव्हा पालक स्वत: मुलांना मोबाईल फोन देतात. पालकांनी ही सवय बदलण्याची गरज आहे. नाहीतर लवकरच मुलाला मायोपिया होईल. मोबाईलमधील हलणारी चित्रे आणि आवाज याचं मुलांना आकर्षण असतं. लहान मुलं त्यात मग्न होतात. पण, हे त्यांच्या डोळ्यांसाठी आणि एकूण विकासासाठी चांगलं नाही.
पेरेंटल एज्युकेशन गरजेचं
प्रो. जीवन एस. तितियाल यांच्या म्हणण्यानुसार, पेरेंटल एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. पालकांनी मुलांना आउटडोअर अॅक्टिव्हिटींसाठी प्रोत्साहन द्यावं. जर पालकांना हाय मायोपिया असेल तर मुलांनाही मायोपिया होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.