एक-दोन नव्हे 200 पेक्षा अधिक आजार दूर राहतील; आठवड्यातून फक्त एकदाच करा हे काम

Last Updated:

तुम्ही रोज हेल्दी डाएट घेत असाल, लाईफस्टाईल हेल्दी असेल पण दररोज व्यायामाला वेळ मिळत नसेल तर आता त्यावर एक उपाय आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : आयुष्य दीर्घ असण्यापेक्षा ते निरोगी असणं जास्त महत्त्वाचे आहे. पण आपल्यापैकी किती जण निरोगी आयुष्य जगतात? शरीरात रोज काही नवीन समस्या आपल्याला जाणवतात. आपण वैज्ञानिक निष्कर्ष पाहिल्यास निरोगी आयुष्यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही. यासाठी तुम्हाला हेल्दी डाएट, हेल्दी लाईफस्टाईल आणि रेग्युलर एक्सरसाईज लागतो. तुम्ही रोज हेल्दी डाएट घेत असाल, लाईफस्टाईल हेल्दी असेल पण दररोज व्यायामाला वेळ मिळत नसेल तर आता त्यावर एक उपाय आहे. तुम्हाला निरोगी राहण्यासाठी रोज व्यायाम करायची गरज नाही. तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा व्यायाम करून निरोगी राहू शकता.
एका आठव्यात 150 मिनिटांचे ब्रिस्क एक्सरसाईज करण्याचा सल्ला दिला जातो. सर्क्युलेशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्च पेपरमध्ये असा दावा केलाय की जर तुम्ही नियमित व्यायामाऐवजी फक्त वीकेंडला व्यायाम केला तरीही तुम्हाला तेवढाच फायदा होईल. व्यायामामुळे तुम्ही हार्ट डिसीज, डायबेटिस, ब्लड प्रेशर असे 200 हून अधिक आजारांपासून बचाव करू शकता. हा अभ्यास 89,573 स्वयंसेवकांवर करण्यात आला. तुम्ही कधी व्यायाम करता यापेक्षा किती वेळ व्यायाम करता याला जास्त महत्त्व असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. तुम्ही एका आठवड्यात रोज 150 मिनिटं व्यायाम केल्यावर जो फायदा होतो, तोच फायदा तुम्ही 150 मिनिटांचा व्यायाम एकाच दिवशी केल्यानेही मिळतो.
advertisement
हार्ट डिसीज, डायबेटिसचा धोका कमी
मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या मनगटावर बांधलेल्या रिस्ट बँडमधून ते रोज आणि आठवड्यातून किती दिवस व्यायाम करतात, याची माहिती घेतली. संशोधकांनी बरीच वर्षे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवलं. अभ्यासानुसार, जे लोक नियमित व्यायाम करतात आणि ज्यांनी वीकेंडला व्यायाम केला त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखाच फायदा मिळाला. यामुळे डायबेटिस व हार्ट डिसीजची जोखीम कमी होते. उदाहरणार्थ, व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत, नियमित व्यायाम करणाऱ्यांमध्ये आणि वीकेंडला व्यायाम करणाऱ्यांमध्ये हाय ब्लड प्रेशर जोखीम 20 टक्क्यांनी तर डायबेटिसचा धोका 40 टक्क्यांनी कमी झाला.
advertisement
किती तास व्यायाम करता हे महत्त्वाचे
हा अभ्यास आपल्या आश्चर्यचकित करणारा असल्याचं प्रमुख संशोधक डॉ.शान खुर्शीद यांनी म्हटलंय. तुम्ही किती दिवस व्यायाम करता याने काही फरक पडत नाही, तर तुम्ही किती वेळ व्यायाम करता हे जास्त महत्त्वाचे आहे, असे अभ्यासातून दिसून येते. सध्याचा काळ खूप धावपळीचा आहे, लोकांना रोज व्यायामासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच आजार वाढत आहेत. मात्र नियमित व्यायाम करत नसले तरी आठवड्यातून एक-दोन दिवसही ते व्यायाम करत नाहीत. त्यांना वाटतं त्याने काही होणार नाही. मात्र या अभ्यासानुसार, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आठवड्यातून एक किंवा दोन दिवस जास्त वेळ व्यायाम करू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
एक-दोन नव्हे 200 पेक्षा अधिक आजार दूर राहतील; आठवड्यातून फक्त एकदाच करा हे काम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement