TRENDING:

Bloating : होळीनंतर सुरु झाल्या पोटाच्या तक्रारी ? जड पदार्थ पोटात गेल्यावर काय होतं ? पोट ताळ्यावर आणण्यासाठी काय करायचं ?

Last Updated:

सणादरम्यान खाल्लेलं जास्त तेल, साखर आणि जड पदार्थ पचवण्याचा आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न शरीर करत असतं. यामुळे पोटात जडपणा, गॅस, पचनाच्या समस्या आणि थकवा जाणवू शकतो. अनेकांना वजन वाढणं किंवा उर्जेचा अभाव त्यामुळे थकवा देखील जाणवतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या आठवड्यात होळी साजरी झाली, धुलिवंदनात रंगांमधे न्हाऊन झालं आणि सण म्हणून गोड धोड, चविष्ट, तेलकट खाऊनही झालं.
News18
News18
advertisement

विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत भारतीय सण आनंदात साजरा करतात. सोबत असतात थंड पेयही. पण सणाच्या उत्साहात, लोक अनेकदा त्यांच्या दैनंदिन आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि जास्त प्रमाणात तळलेलं, गोड आणि जंक फूड खातात.

होळीनंतर, बऱ्याच जणांना पोट फुगण्याचा म्हणजे ब्लोटिंगचा त्रास होतो. सणादरम्यान खाल्लेलं जास्त तेल, साखर आणि जड पदार्थ पचवण्याचा आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न शरीर करत असतं. यामुळे पोटात जडपणा, गॅस, पचनाच्या समस्या आणि थकवा जाणवू शकतो. अनेकांना वजन वाढणं किंवा उर्जेचा अभाव त्यामुळे थकवा देखील जाणवतो.

advertisement

Dementia :डिमेंशिया रुग्णाची काळजी कशी घ्यावी ? कुटुंबीयांसाठी केअर गाईड

तुम्ही म्हणाल होळी तर होऊन गेली आता त्याचा काय संबंध ? पण शरीर सतत संकेत देत असतं. आहारतज्ज्ञ सिमरत कथुरिया यांनी याविषयीची माहिती दिली. सणानंतर किंवा काही जड पदार्थ खाल्ल्यानंतर ब्लोटिंग होत असेल तर दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे.

advertisement

एक म्हणजे शरीराला हायड्रेट ठेवणं आणि पचनसंस्थेचं संतुलन राखणं. आहारतज्ज्ञांच्या मते, सणानंतर  किंवा असे जड, गोड, तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर हायड्रेटेड राहणं अत्यंत महत्वाचं आहे. हे साध्य करण्यासाठी, दिवसभर भरपूर पाणी प्या. याव्यतिरिक्त, लिंबू पाणी किंवा बडीशेप पाणी यांसारखी नैसर्गिक पेयं देखील फायदेशीर ठरू शकतात, कारण ते पोटातील सूज कमी करण्यासाठी आणि चयापचय सुधारण्यासाठी मदत करतात.

advertisement

जेवण वगळू नका - अनेक जण होळीनंतर म्हणजे जास्त खाल्लेलं असतं म्हणून त्याची भरपाई करण्यासाठी जेवण वगळण्याचा किंवा क्रॅश डाएट करण्याचा प्रयत्न करतात, पण हा योग्य दृष्टिकोन नाही असं तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञांच्या मते, जेवण वगळल्यानं शरीर कमकुवत होऊ शकतं आणि पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, घरी हलकं आणि संतुलित जेवण खाणं चांगलं आहे कारण यामुळे शरीर हळूहळू सामान्य स्थितीत येईल.

advertisement

Kidney Stone : उन्हाळ्यात वाढतो किडनी स्टोनचा धोका, उन्हाळ्यात घ्या विशेष काळजी

पोटात जडपणा किंवा सुस्ती वाटत असेल, तर याचा अर्थ असा की, जास्त तळलेलं अन्न आणि साखर खाल्ल्यानं आतड्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, तीन तास ते काम केलं अन् आयुष्य बदललं, कमाईचा आकडा तर पाहा, Video
सर्व पहा

यासाठी, तुमच्या आहारात दही आणि ताक यांसारखे आंबवलेले पदार्थ असणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना संतुलित करण्यास मदत होते. शिवाय, आलं आणि हळद खाण्यानंही पचन सुधारायला मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bloating : होळीनंतर सुरु झाल्या पोटाच्या तक्रारी ? जड पदार्थ पोटात गेल्यावर काय होतं ? पोट ताळ्यावर आणण्यासाठी काय करायचं ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल