कांद्यातली पोषक तत्त्वे आणि कांद्याचे आरोग्यदायी फायदे
आहारतज्ज्ञांच्या मते कांद्यामध्ये भरपूर खनिजं असतात. जी पॅन्क्रियाजसाठी फायद्याची ठरतात. यामुळे रक्तात इन्सुलिन योग्य प्रमाणात सोडलं जातं आणि रक्तातली साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे रोज कच्चा कांदा खाल्यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहायला मदत होते. कांद्यावर लिंबाचा रस पिळून तो काळ्या मिरी पावडरसोबत खाल्ल्याने त्याची चव तर वाढतेच मात्र त्याबरोबर पचनशक्ती सुधारायला मदत होते. कांद्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून संक्रामित आजारांपासून शरीराचं रक्षण होतं. काही आहारतज्ज्ञ दावा करतात की, नियमितपणे कच्चा कांदा खाणाऱ्या व्यक्तींना सहजासहजी सर्दी, खोकल्याचा त्रास होत नाही.
advertisement
जाणून घेऊयात रोज कच्चा कांदा खाण्याने कोणत्या आजारांना दूर ठेवता येऊ शकतं ?
1) पचन:- कांद्यात असलेल्या फायबर्समुळे रोज कच्चा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. त्यामुळे गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठतेच्या आजारांपासून आराम मिळतो. याशिवाय कांद्यात असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात.
2) सर्दी आणि खोकला:- कांद्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिनसी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकल्या सारख्या संक्रामित आजारांचा धोका टाळता येतो.
3) डायबिटीस नियंत्रणात राहतो :- कच्चा कांदा खाल्ल्याने इन्सुलिन योग्य प्रमाणात स्रवण्यात मदत होते, त्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
4) रक्ताभिसरण:- कच्चा कांदा खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगलं होतं. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो.
कच्चा कांद्याचे अनेक फायदे जरी असले तरीही काही व्यक्तींसाठी तो हानीकारक ठरू शकतो.
अपचानाचा त्रास:- कांदा हा पचनास मदत करतो हे आपण पाहिलं मात्र काही लोकांना कांद्याचा त्रास होतो. अशा व्यक्तींनी कांदा खाल्ल्यास त्यांना ब्लोटिंग आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. कच्चा कांदा खाल्ल्यानेही छातीतही जळजळ होऊ शकते.
कच्चा कांदा खाल्ल्याने रक्त पातळ जरी होत असलं तरीही डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी आणि ज्याचं रक्त आधीच पातळ आहे अशा व्यक्तीसांठी कांदा खाणं धोक्याचं ठरू शकतं. अशा व्यक्तींना एखादी जखम झाली तर त्यांना अधिक रक्तस्त्राव होऊन मृत्यू होण्याती भीती असलेत.
दिवसाला कांदा खाण्याचं योग्य प्रमाण काय?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, दररोज अर्धा ते एक कच्चा कांदा खाणं फायद्याचं मानलं जातं. नियंत्रित प्रमाणात कांदा खाल्ल्यामुळे दुष्परिणांमाचा धोका टळून आरोग्याला विविध फायदे मिळू शकतात.