काळं लिंबाचं लोणचं... वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. अभिनेत्री परिणिती चोप्राचं हे आवडतं लोणचं आहे. एका व्हिडीओत परिणितीने सांगितलं की तिला लोणचं खूप आवडतं आणि त्यातही विशेषत: काला निंबू आचार म्हणजे काळं लिंबाचं लोणचं. बिनतेलाचं हे लोणचं जे जितक्या जास्त दिवसाचं तितकं चांगलं, असं तिनं सांगितलं.
Shevaga Ladu : शेवग्याची पानं, शेंगांची भाजी तर नेहमीच खाता; आता एकदा शेवग्याचा लाडू बनवून पाहा
advertisement
आता हे लोणचं बनवायचं कसं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात परिणीती चोप्राच्या लोणच्याच्या व्हिडीओसह या लोणच्याची रेसिपीही दाखवण्यात आली आहे.
व्हिडीओत दाखवल्यानुसार लिंबू घेऊन त्याला 4 चीर द्यायचे आहेत. जशी आपण भरली वांगी करण्यासाठी वांगी कापतो अगदी तशाच पद्धतीने लिंबू कापायचे आहेत. मीठ आणि काळं मीठ एकत्र करायची, हे मीठ त्या लिंबूच्या आत भरायचं आहे. हे लिंबू काचेच्या भरणीत भरायचे. आता यावर ओवा आणि जिरं यांची पूड करून ती या लिंबावर टाकायची. बरणीचं झाकण बंद करून बरणी थोडी हलवून ती 5 दिवस उन्हात ठेवून द्या.
मुलाला फक्त एकच दिवस टिफिन देते गिरीजा ओक, तरी महिनाभर खातो; अभिनेत्रीने सांगितली भन्नाट आयडिया
5 दिवसांनी तुम्ही बरणीचं झाकण उघडाल तर लिंबाचं रंग बदललेला दिसेल. ते नरमही झालेले दिसतील. हे तुमचं काळं लिंबाचं लोणचं तयार. तुम्ही हे तोंडी लावायला किंवा गरमागरम पराठ्यासोबत खाऊ शकता.
(@prakshi_kitchen या इन्स्टाग्राम अकाऊंटवर परिणीतीच्या व्हिडीओसह लिंबाच्या रेसिपीचाही व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवून पाहा आणि कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
