शेंगदाणे
शेंगदाण्यांचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी आहे. शेंगदाण्यामध्ये असलेले कॅल्शियम, फॉस्फरस, मँगनीज आणि कार्बोहायड्रेट्स शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात, म्हणजेच शेंगदाणे खाल्ल्याने रक्तात साखर हळूहळू सोडली जाते. शेंगदाणे खाल्ल्याने महिलांना टाइप २ डायबिटीसचा धोका कमी होतो.
लसूण आणि मुळा
लसणात ॲलिसिन नावाचा घटक असतो जो रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढवतो. त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. मधुमेहींनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज भाजीतून किंवा थेट लसण्याच्या पाकळ्या खाव्यात. मुळ्यामध्ये अँथोसायनिन नावाचे फ्लेव्होनॉइडचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील मुळा फायदेशीर ठरु शकतो.
advertisement
भात खावा की नाही ?
डायबिटीस असलेल्या रूग्णांना भात खावासा वाटतो. भातामुळे वजन वाढतं असं म्हणतात. मात्र योग्य प्रमाणात भात खाल्ला तर त्याचा फायदा होतो. भारतात तांदळाच्या अनेक प्रजाती आहेत. बासमती तांदूळ हे सर्वात लांब आणि सुगंधित तांदूळ आहे. याशिवाय सध्या ब्राऊन आणि लाल भाताला खूपच मागणी आहे. कारण त्यात कमी कॅलरीज आणि जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर, आणि मिनरल्स आढळतात. याशिवाय दाल खिचडी ही डायबिटीसच्या रूग्णांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. कारण खिचडीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. जे हेल्दी बॅक्टेरियांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. पचनक्रियेत सुधारणा होऊन आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय संतुलित पचनक्रिया शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन वाढत नाही.
डायबिटीस असणाऱ्यांनी कोणती फळे खावीत?
डायबिटीस असलेल्या व्यक्तींना फळं खाण्यावर निर्बंध असतात. मात्र जर त्यांनी योग्य फळांची निवड केली. ती प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ली तर त्यांना फायदाच होईल. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी यात फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. लिंबूवर्गीय फळं म्हणजेच संत्रे, मोसंबी, लिंबू, यात व्हिटॅमिन C जास्त असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सफरचंद आणि नासपती हे फायबर भरपूर, लोह आणि पोटॅशियमचे चांगले स्रोत आहेत. डाळिंबात अँटीऑक्सिडंट्सने भरपूर प्रमाणात असतात. या सगळ्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स (LGI) कमी आहे. म्हणजेच ही फळं रक्तात साखर हळूहळू सोडतात, त्यामुळे ती डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायद्याची मानली जातात.
हे सुद्धा वाचा : Custard Apple for Diabetes: डायबिटीस आहे तरीही बिनधास्त खा सीताफळ; होतील अनेक फायदे
