त्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, थंडीत त्यांचा बीपी आणखी वाढण्याची शक्यता जास्त असते. छातीत दडपण, चक्कर येणे अशी लक्षणे तीव्र होऊ शकतात. थंडीचा परिणाम थेट रक्तवाहिन्यांवर होतो. नसा अरुंद झाल्याने रक्तप्रवाहाला प्रतिरोध निर्माण होतो. शरीर हा प्रतिरोध ओलांडण्यासाठी अधिक दाबाने रक्त पंप करते. यालाच बीपी वाढणे म्हणतात.रक्तवाहिन्या संकुचित झाल्या तर हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्त मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे हृदयावर ताण वाढतो. यातून हृदयविकाराचा धोका वाढतो.
advertisement
थंडीमुळे बोटे थंड पडणे, कडक होणे, मुंग्या येणे अशी लक्षणे दिसून येतात. नसा आकुंचन पावतात. हृदयाला अधिक दाबाने रक्त पंप करावे लागते. ज्यांच्यात मिठाचे प्रमाण जास्त किंवा वजन वाढलेले आहे, त्यांच्यात बीपी आणखी वाढतो. शारीरिक हालचाली कमी झाल्यानेही बीपी वाढू शकतो. सकाळी थंडीत बाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावेत. गरम पाणी पिणे, वाफ घेणे, शरीराला कोमट ठेवणे. मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. रोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करावा. ध्यान, श्वसन व्यायाम करावे. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत.
अचानक तापमान बदलापासून (थंडातून गरम/गरमातून थंडी) टाळावे. असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. जर तुम्ही सर्व गोष्टींचा पालन केलं तर तुम्हाला देखील थंडीमध्ये याचा कुठलाही दुकान निर्माण होऊ नये असं हृदयरोग तज्ञ डॉक्टर गणेश सपकाळ यांनी सांगितला.