पुणे: सध्याच्या काळात ट्रेंडी आणि हटके कपडे परिधान करण्याकडे महिला आणि पुरुषांचा कल आहे. त्यासाठी बऱ्याचदा कपड्यांना आरीवर्क किंवा एम्ब्रॉयडरी केली जाते. साडी, ड्रेस, ब्लाउज, कुर्ती, शेरवानी यांसारख्या कपड्यांना आरीवर्क केल्यामुळे ते अधिक खुलून दिसतात. पुण्यातील रविवार पेठ मनीष मार्केट येथे आरीवर्कचं साहित्य अगदी स्वस्तात मिळतंय. त्यामळे होलसेल दरात, मनी, खडे, वर्क मटेरियल घेण्यासाठी येथे नेहमीच गर्दी असते.
advertisement
पुण्याच्या रविवार पेठ मनीष मार्केट लेनजवळ पी. के. ट्रेडर्स हे 30 वर्षे जुनं दुकान आहे. याठिकाणी अगदी स्वस्तात आरीवर्क आणि भरतकामाचं साहित्य मिळतं. इथं कारागिरांकडून खास बनवून घेतलेल्या काही खास वस्तू देखील मिळतात. यामध्ये मोती, स्टोन रोल, मेटल चैन, फॅब्रिक ग्लू, साडी लेस, ब्लाउज लेस, तसेच इतर वेगवेगळ्या व्हरायटीच्या खास लेस या 40 रुपयांपासून ते 1200 रुपये पर्यंत बंडल मिळतात.
शिवलेले ब्लाउज झाले महाग, महिलांसाठी खास रेडिमेड पर्याय, पुण्यात इथं मिळतात भरपूर व्हरायटी
साडी, ब्लाउज किंवा इतर कपड्यांना वापरण्यासाठी लेसचे विविध प्रकार दुकानात उपलब्ध आहेत. यामध्ये जरी लेस, वेलवेट पॅटर्न लेस, कच्छी वर्क अशा 30 ते 40 व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच विशेष कार्यक्रमांत साडी, ब्लाउज किंवा इतर ड्रेसवर लावण्यासाठी खास पॅच देखील मिळतात. त्याच्या किमतीही 30 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, अशी माहिती व्यवसायिक प्रकाश डांगी यांनी दिली आहे.
दरम्यान, एम्ब्रॉयडरी डिझाईनची मागणी वाढली असल्याने महिला या मार्केटमध्ये आवर्जून येतात. अगदी होलसेल दरात सिंगल किंवा बंचमध्ये देखील या वस्तू खरेदी करता येतील.





