पुणे : महिला आणि मुलींमध्ये साडीची क्रेझ नेहमीच असते. आजकाल साडीवर वेगळा किंवा मिस मॅच ब्लाउज परिधान करण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे एक वेगळा आणि हटके लूक देखील मिळतो. त्यामुळेच महिला आता ब्लाउज शिवून न घेता रेडिमेडचा पर्याय निवडताना दिसतात. त्यातच लग्नसराईत आपल्या साडीवर लगेच ब्लाउज शिवून मिळणं अशक्य असतं. त्याच शिवलेला ब्लाउज महाग पडतो. तेव्हा सुंदर लूकसाठी तुम्ही देखील खास डिझाईनचे रेडिमेड ब्लाउज खरेदी करू शकता. पुण्यात अगदी होलसेल दरात रेडिमेड ब्लाउज उपलब्ध आहेत.
advertisement
गेल्या काही काळात रेडिमेड ब्लाउज परिधान करण्याकडे महिला व मुलींचा कल वाढला आहे. पुण्यात अनेक जणींना रेडिमेड ब्लाउज खरेदी करायचे असतात. त्यांच्यासाठी पुण्यातील रविवार पेठ इथे असणारे डागा हे दुकान उत्तम पर्याय आहे. 50 वर्षे जुनं असणाऱ्या या दुकानात गेल्या 8 वर्षांपासून खास रेडिमेड ब्लाउज मिळतात. अगदी 300 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत इथे ब्लाउजच्या किमती असून अनेक व्हरायटी देखील उपलब्ध आहेत.
लग्नासाठी खरेदी करा सुंदर दागिने, किंमत 400 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये का?
किंमत कमी, व्हरायटी भरपूर
या दुकानात होलसेल दरात रेडिमेड ब्लाउजचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विविध डिझाईनचे ब्लाउज फक्त 300 रुपयांपासून मिळतात. यामध्ये होजिअरी, मायक्रो, सिल्क, प्युअर सिल्क,ऑरगॅनझा, ब्रॉकेट, वर्क अशा जवळपास 50 व्हरायटी पाहायला मिळतात. ब्रायडलसाठी डोली पॅटर्न, हेवी वर्क, मशीन वर्क असलेले ब्लाउज 550 रुपयांपासून मिळतात. तर पैठणी, ब्रोकरी सिल्क, हॅन्डवर्क, मशीन वर्क, शिफर, फॅन्सी, असे विविध प्रकारच्या व्हरायटी देखील स्वस्तात उपलब्ध आहेत, अशी माहिती मीना मुंढे यांनी दिली.
तुम्ही पुणेकर असाल किंवा पुण्यात आल्यावर खरेदी करणार असाल तर रेडिमेड ब्लाउजसाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही विविध व्हरायटींतून खास डिझाईनचा ब्लाउज खरेदी करू शकता.





