पुणे : साडी हा बहुतांश स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या पारंपरिक आणि मॉडर्न लूकचे मिश्रण करून वेगवेगळ्या स्टाईलचे ब्लाउज घालण्याची फॅशन लोकप्रिय होत आहे. ग्लॅमरस लूकसाठी ब्लाउज महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या लग्न सराईला सुरुवात झाली आहे. महिला आणि मुली साडीवर परिधान करण्यासाठी मॅचिंगचे आणि वेगवेगळे ब्लाउज घेत असतात. नेहमीच्या वापरासाठी किंवा विशेष संमारंभासाठी देखील ब्लाउज घ्यायचे असतील तर पुण्यात फक्त 300 रुपयांपासून फॅन्सी व्हरायटी उपलब्ध आहेत. याबाबत पुण्यातील व्यावसायिक सोनाली ओसवाल यांच्याकडून लोकल18 च्या माध्यमतून जाणून घेऊ.
advertisement
पुण्यातील सदाशिव पेठ इथे वैभवी दुपट्टा हाऊस आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज पाहायला मिळतात. सुंदर आणि आकर्षक डिझाइन असलेले प्रिंट ऑन प्रिंट ब्लाउज या सारखे उत्तम पर्याय इथं उपलब्ध आहेत. सध्या फ्लॉवर प्रिंट असलेल्या ब्लाउजची क्रेझ आहे. त्यामुळे पारंपरिक साडीला आधुनिक लूक मिळतो. अशा प्रकारच्या ब्लाउज खरेदीकडे महिला आणि मुलींचा कल दिसत आहे. हे ब्लाउज अगदी 300 रुपयांपासून या ठिकाणी मिळतात.
पुणेकरांनो सावधान! GSB चा धोका वाढला, प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती
गेली पाच ते सहा वर्ष झालं व्यवसाय करत असून फॅन्सी ब्लाउज तसेच रोजच्या वापरासाठी, विशेष कार्यक्रम प्रसंगी घालण्यासाठी लागणारे ब्लाउज आमच्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये बेसिक ब्लाउज हे 300 रुपयांपासून सुरु होतात. फॅन्सी, टिकलीवाले, वर्क असलेले तसेच वेगवेगळे कलर आणि डिझाईन देखील यामध्ये आहेत. कॉटन सिल्क, प्युअर कॉटन, सिमर, वेलवेट, कॉटन सिल्क असे जवळपास 30 हून अधिक वेगवेगळ्या व्हरायटी देखील यामध्ये आहेत. कमीत कमी 300 रुपये ते 1200 रुपयांपर्यंत ब्लाउज आहेत. साईझमध्ये देखील 32 पासून ते 40 पर्यंत उपलब्ध असल्याचे व्यावसायिक सोनाली ओसवाल यांनी सांगितले.





