TRENDING:

Ginger Halwa : थंडीच्या दिवसांत वरदान ठरेल 'आल्याचा हलवा'; खोकला-सर्दी होईल दूर, नोट करा ही सोपी रेसिपी

Last Updated:

हो, तुम्ही बरोबर वाचलंत! चवीला चटपटीत आणि शरीरासाठी अत्यंत उबदार असणारा हा हलवा केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळा सुरू झाला की घराघरात सर्दी, खोकला आणि घसा दुखीचे रुग्ण वाढू लागतात. अशा वेळी आपण औषधांसोबतच काही घरगुती उपाय शोधत असतो. आल्याचा चहा तर आपण नेहमीच पितो, पण तुम्ही कधी 'आल्याचा हलवा' (Ginger Halwa) खाल्ला आहे का?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

हो, तुम्ही बरोबर वाचलंत! चवीला चटपटीत आणि शरीरासाठी अत्यंत उबदार असणारा हा हलवा केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतो. आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आल्याचा हलवा कसा बनवायचा, याची सविस्तर कृती सांगणार आहोत.

आल्याचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

आलं: 150 ग्रॅम (ताजे आणि स्वच्छ)

दूध: 1 लिटर (पूर्ण क्रीम असलेले दूध वापरल्यास उत्तम)

advertisement

साखर: आवडीनुसार (किंवा पाऊण कप)

साजूक तूप: अर्धा कप

वेलची पूड: 2 छोटे चमचे

सुका मेवा: काजू, बदाम, पिस्ते (गरजेनुसार)

कसा बनवायचा आल्याचा हलवा? (Step-by-Step Recipe)

1. पूर्वतयारी: सर्वात आधी १५० ग्रॅम आलं घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याची सालं काढून घ्या आणि आल्याचे बारीक किसून घ्या. किसलेले आलं वापरल्याने हलव्याला छान टेक्स्चर मिळते.

advertisement

2. आलं परतून घ्या: एका पॅनमध्ये अर्धा कप साजूक तूप गरम करा. तूप वितळले की त्यात किसलेले आलं टाका. आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत साधारण 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर हलके परतून घ्या. आल्याचा रंग थोडा बदलला की समजून जा ते व्यवस्थित भाजले आहे.

3. दुधाचा वापर: आता भाजलेल्या आल्यामध्ये 1 लिटर दूध घाला. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा आणि हे मिश्रण सतत ढवळत राहा. दूध पूर्णपणे आटेपर्यंत आणि त्याला खोव्यासारखा दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्या. या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, पण यामुळेच हलव्याला खरी चव येते.

advertisement

4. साखर आणि वेलची पूड: जेव्हा दूध पूर्णपणे आटून मिश्रण कढई सोडू लागेल, तेव्हा त्यात साखर आणि वेलची पूड टाका. साखर वितळल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा थोडं सैल होईल, त्यामुळे ते पुन्हा 3-4 मिनिटे परता.

4. गार्निशिंग: शेवटी, एका छोट्या पॅनमध्ये थोडे तूप घेऊन त्यावर काजू-बदाम तळून घ्या आणि हे तळलेले सुके मेवे तयार हलव्यावर टाका. तुमचा गरमागरम आणि पौष्टिक आल्याचा हलवा तयार आहे!

advertisement

आल्याचा हलवा खाण्याचे फायदे:

प्रतिकारशक्ती वाढते: आल्यातील औषधी गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

सर्दी-खोकल्यापासून आराम: हिवाळ्यात घसा खवखवणे किंवा जुनाट खोकला असल्यास हा हलवा अत्यंत गुणकारी ठरतो.

पचनशक्ती सुधारते: आलं पचनासाठी उत्तम मानले जाते, त्यामुळे जेवणानंतर थोडा हलवा खाल्ल्यास पचन नीट होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

शरीरात उब निर्माण करतो: थंडीच्या दिवसांत हा हलवा शरीराला आतून ऊब देण्याचे काम करतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Ginger Halwa : थंडीच्या दिवसांत वरदान ठरेल 'आल्याचा हलवा'; खोकला-सर्दी होईल दूर, नोट करा ही सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल