मुंबई : गणेशोत्सव आता अगदीच 4 दिवसांवर आहे. या आठवड्याच्या शेवटी घरोघरी बाप्पाचं आगमन होईल. त्याच्यासाठी खास उकडीच्या मोदकांचा बेत केला जाईलच. त्यासोबत आपल्याला घरच्या घरी वेगळी खास अशी मिठाई बनवायची असेल तर आपण मलईदार कलाकंद बनवू शकता. दुधापासून जसे रसगुल्ले बनवले जातात तसाच हा कोकणातला खूप प्रसिद्ध आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. त्याची सोपी रेसिपी पाहूया.
advertisement
मलाईदार कलाकंद बनविण्यासाठी लागणारं साहित्य :
अर्धा लिटर फाटलेलं दूध, 1 चमचा वेलचीपूड, 2-3 चमचे दूध पावडर, चवीनुसार साखर किंवा पिठीसाखर, फ्लेव्हरसाठी थोडं तूप.
मलाईदार कलाकंद बनविण्याची कृती :
सर्वात आधी फाटलेलं दूध तापवून घ्यावं. दुधातलं पाणी थोडं थोडं कमी होत असताना त्यात 2 चमचे तूप घालावं. दूध आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यातलं पाणी पूर्ण आटल्यानंतर वेलचीपूड, दूध पावडर आणि आवडीनुसार योग्य प्रमाणात साखर घाला.
हे मिश्रण एकजीव होऊद्या. तयार झालेलं कलाकंद पाणी पूर्णपणे जाईपर्यंत गॅसवर ठेवा. मग एका वाटीत काढून सर्व्ह करा. अशापद्धतीनं आपण मलईदार कलाकंद बनवू शकता. वरून छान ड्रायफ्रूट्सची सजावट करा.