उकडीचे मोदक अजिबात फुटणार नाहीत, तोंडात ठेवताच विरघळतील! परफेक्ट रेसिपी
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Ukadiche Modak Recipe: सुनिता शेटे यांनी साध्या उकडीचे आणि गुलकंद उकडीचे मोदक कसे बनवायचे हे सविस्तरपणे सांगितलंय.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आता बाप्पाचं आगमन काही दूर नाही. आपण आतुरतेनं त्याची वाट पाहतोय. घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या पाहुणचारासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गणरायाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. तुम्हालासुद्धा यंदाच्या गणेशोत्सवात अत्यंत सुरेख असे कळीदार आणि तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळतील एवढे स्वादिष्ट मोदक बनवायचे असतील तर त्याची रेसिपी आजच नोट करून ठेवा. सुनिता शेटे यांनी साध्या उकडीचे आणि गुलकंद उकडीचे मोदक कसे बनवायचे हे सविस्तरपणे सांगितलंय.
advertisement
उकडीच्या मोडकांसाठी लागणारे साहित्य :
- 1 वाटी तांदळाचं पीठ
- 1 वाटी पाणी
- 1 वाटी ओल्या नारळाचा किस
- 1 वाटी गूळ
- चवीनुसार वेलचीपूड
- केशर
- तूप
- थोडी खसखस
- चवीनुसार मीठ
- गुलकंद
- खायचा रंग
उकडीच्या मोदकांची कृती :
सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची. कढई तापल्यावर त्यात वाटीभर पाणी घ्यायचं. त्यात चिमूटभर मीठ आणि चमचाभर तूप घालून एक उकळी येऊद्या. उकळी आल्यावर थोडं थोडं करून या पाण्यात तांदळाचं पीठ घालायचं. ते छान एकजीव होऊद्या. मग 5 मिनिटं त्यावर झाकण ठेवून वाफ येऊद्या. आता हे मिश्रण एका ताटात काढून व्यवस्थित मऊ होईपर्यंत मळून घ्या.
advertisement
पीठ मळून झालं की ते थोडं तूप लावून बाजूला ठेवा. यापासून आपण साधे मोदक बनवू शकता. जर गुलकंद मोदक बनवायचे असतील तर या उकडमध्ये थोडा रंग घाला, जेणेकरून उकड रंगीत होईल.
आता सारणासाठी कढईत ओल्या नारळाचा किस, थोडी खसखस आणि गूळ हे मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात थोडं तूप आणि वरून वेलचीपूड घाला. गूळ विरघळेपर्यंत मिश्रण ढवळत राहा. तसंच गुलकंद मोदक बनवण्यासाठी आपण जो वाटीभर गूळ घेतलाय त्यातले 2 चमचे कमी करून त्यात 2 चमचे गुलकंद घाला. साध्या मोदकांच्या सारणासाठी केलेली कृती इथंसुद्धा सारखीच करायची आहे.
advertisement
आता मळलेल्या उकडीचे लहान लहान गोळे बनवून घ्या. सर्व गोळ्यांची समान अशी पारी करून त्यांना नाजूकशा कळ्या पाडा. त्यात तयार सारण भरून घ्या. आता मोदक तयार आहेत. हे मोदक गॅसवर वाफवण्यासाठी ठेवा. त्यांना वरून थोडं तूप आणि आवडीनुसार केशर लावा. 10 ते 15 मिनिटं चांगली वाफ येऊद्या. त्यानंतर आपले उकडीचे स्वादिष्ट असे मोदक तयार असतील. ते एका ताटात काढून वरून साजूक तूप सोडा. हे मोदक खाऊन खवय्ये अगदी तृप्त होतील.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 30, 2024 7:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उकडीचे मोदक अजिबात फुटणार नाहीत, तोंडात ठेवताच विरघळतील! परफेक्ट रेसिपी