हिरवं मीठ तयार करण्याची कृती
साहित्य
- ½ कप मीठ (सेंधव मीठ किंवा सामान्य मीठ)
- ½ कप काळं किंवा लाल मीठ
- 1 कप ताज्या पुदिनाच्या पाला
- 1 चमचा धने
- 2-3 हिरव्या मिरच्या
- 4-5 हिरव्या लसूण पाकळ्या
- 1 चमचा जिरे
तयार करण्याची पद्धत
- सर्वप्रथम, ½ कप मीठ, 1 कप ताजे पुदिनाचे पाने, 1 चमचा धने, 2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 हिरव्या लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे एका भांड्यात घ्या.
- आता याला मिक्सरमध्ये बारीक करून किंवा मिक्स करून, थोडं कोरडं मिश्रण तयार करा.
- आता या मिश्रणाला एका मोठ्या भांड्यात घ्या आणि त्यात ½ कप सामान्य मीठ आणि ½ कप लाल मीठ घाला.
- या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे हलवून एकत्र करा. यामुळे त्याची चव आणि सुगंध अधिक खुलून येईल.
- आता मिश्रण व्यवस्थित वाळवा. तुम्ही ते सूर्यप्रकाशात वाळवू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये देखील वाळवू शकता.
- तुम्हाला जर फाइन पावडर हवा असेल तर, या मिश्रणाला मिक्सरमध्ये घालून चांगले घुसळा. तुमचा ग्रीन सॉल्ट तयार आहे.
advertisement
advertisement
कसा वापर करावा?
तुम्ही हा हिरवं मीठ दही, रायता, सॅलड, चाट, पराठा किंवा डाळ-भाजीमध्ये घालून वापरू शकता. यामुळे तुमच्या अन्नाची चव एकदम वाढेल. हा ग्रीन सॉल्ट तुम्ही रोजच्या जेवणात वापरून तुमच्या अन्नाचा स्वाद दुप्पट करू शकता!
advertisement
हे ही वाचा : चीज कॉर्न सँडविच ते चिकन पॉपकॉर्न पिझ्झा, एकाच ठिकाणी 10 हून अधिक प्रकार, खाण्यासाठी खवय्यांची गर्दी
हे ही वाचा : 'या' लोकांच्या आरोग्यसाठी चिकू ठरेल विष! फायद्यापेक्षा होईल नुकसानचं जास्त
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
कधी खाल्लंय का हिरवं मीठ? चवीला आणि आरोग्यलाही सर्वोत्तम! कशी तयार कराल?