चीज कॉर्न सँडविच ते चिकन पॉपकॉर्न पिझ्झा, एकाच ठिकाणी 10 हून अधिक प्रकार, खाण्यासाठी खवय्यांची गर्दी

Last Updated:

या स्टार्टर्स कॅफेमध्ये पिझ्झा, बर्गरपासून ते अगदी मॅगीपर्यंत सगळे चटपटीत पदार्थ मिळतात. कौस्तुभच्या स्टार्टर्स कॅफेमध्ये पिझ्झा आणि सँडविचचे 10 हून अधिक प्रकार मिळतात.

+
News18

News18

साक्षी पाटील, प्रतिनिधी 
मुंबई : सध्या अनेक उच्चशिक्षित तरुण स्वतःचे कॅफे आणि रेस्टॉरंट खोलताना दिसत आहेत. लोअर परळमधील एका इंजिनिअर तरुणाने सुद्धा इंजिनिअरिंग करून, त्यानंतर काही वर्ष प्रायव्हेट जॉब करून आता स्वतःचा कॅफे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोअर परळ स्टेशन पासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या त्याच्या कॅफेमध्ये कायमच मुंबईकरांची गर्दी असते. या स्टार्टर्स कॅफेमधील चविष्ट पदार्थांमुळे अनेकांची या कॅफेला पसंती मिळत आहे.
advertisement
कौस्तुभ असे या तरुणाचे नाव असून, कौस्तुभचे शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून पूर्ण झालेले आहे. त्याच्या या स्टार्टर्स कॅफेमध्ये पिझ्झा, बर्गरपासून ते अगदी मॅगीपर्यंत सगळे चटपटीत पदार्थ मिळतात. कौस्तुभच्या स्टार्टर्स कॅफेमध्ये पिझ्झा आणि सँडविचचे 10 हून अधिक प्रकार मिळतात.
advertisement
यामध्ये चीज कॉर्न सँडविच, चॉकलेट सँडविच, चीजी सँडविच, चिकन मायो सँडविच, पेरी पेरी पनीर पिझ्झा, चिकन पॉपकॉर्न पिझ्झा, गोल्डन कॉर्न चीज पिझ्झा असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. मिल्कशेक मध्ये इथे मिळणारी कोल्ड कॉफी तर कमाल लागते. हिची किंमत फक्त 79 रुपये असून इथे येणारा प्रत्येक जण आवर्जून ही कोल्ड कॉफी ऑर्डर करतो. जम्बो टॉवर स्नॅक्स हे सुद्धा कौस्तुभची स्पेशालिटी आहे. सध्या इथे अनेक जण स्टार्टर्स कॉम्बो खाण्यासाठी सुद्धा येत आहेत. या स्टार्टर्स कॉम्बोमध्ये तुम्हाला 299 रुपयाला व्हर्जिन मोहितो, क्लासिक मॅगी आणि व्हेज किंवा चिकन बर्गर मिळेल. असे यामध्ये तुम्हाला खूप ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहेत.
advertisement
'कौस्तुभ माझा मोठा भाऊ आहे. तो डेकोरेशन मॅनेजमेंट सुद्धा हे कॅफे सांभाळून करतो. त्यामुळे त्याला जेव्हा कॅफेसाठी वेळ द्यायला जमत नाही तेव्हा मी येते. आमच्या इथे सध्या बेस्ट सेलिंग मध्ये जम्बो टॉवर्स स्नॅक्स हा पदार्थ खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक जण येऊन हा जम्बो टॉवर स्नॅक्स घेतायेत आणि तो लोकांना खूप आवडतोय सुद्धा' असे सुरभी हिने सांगितले.
advertisement
इथला मसालेदार पेरी पेरी चीज पोटॅटो ट्विस्टर सुद्धा खूप कमाल लागतो. मग मंडळी वाट कसली पाहताय? लोअर परळ स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या स्टार्टर्स कॅफेला नक्की भेट द्या आणि हे सगळे फास्ट फूड एन्जॉय करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चीज कॉर्न सँडविच ते चिकन पॉपकॉर्न पिझ्झा, एकाच ठिकाणी 10 हून अधिक प्रकार, खाण्यासाठी खवय्यांची गर्दी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement