अंबाडीची भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
अंबाडीची भाजी, ज्वारी, लसूण, मिरची, जिरे, मीठ आणि तेल हे साहित्य लागेल.
अंबाडीची भाजी बनविण्याची कृती
सर्वात आधी अंबाडीची भाजी शिजायला ठेवायची आहे. भाजी शिजायला थोडा वेळ लागेल. भाजी शिजतपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी ज्वारी बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर मिरची, जिरे आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत भाजी शिजलेली असेल. ती भाजी रवीच्या साहाय्याने बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि मीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात थोडे तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर भाजी 5 मिनिटे शिजू द्यायची आहे. 5 मिनिटानंतर त्यात ज्वारीची कणी टाकून घ्यायची आहे.त्यानंतर भाजी 15 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. पारंपरिक पद्धतीने अंबाडीची भाजी तयार झालेली असेल.
advertisement