चिऊच्या भाजीतला झुणका बनविण्यासाठी लागणारे साहित्य
चिऊची भाजी, कांदा, मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, तेल, लसूण, जिरे, मोहरी, हळद, धने पूड, आमचूर पावडर, मीठ आणि बेसन पीठ हे साहित्य लागेल.
Ambadi Bhaji Recipe: पचनशक्ती राहील चांगली, पावसाळ्यात खा ही भाजी, रेसिपी एकदम सोपी
चिऊच्या भाजीतला झुणका बनविण्याची कृती
सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे. तेल थोडे गरम झाले की, त्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मिरची सुद्धा टाकून घ्यायची आहे. ते थोडे शिजल्यानंतर लसूण टाकून घ्यायचा आहे. नंतर कडीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा आणि ते लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे.
advertisement
कांदा आणि इतर साहित्य लालसर झाल्यानंतर त्यात हळद, धने पूड, आमचूर पावडर, मीठ टाकून घ्यायचे आहे. ते मसाले 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात चिऊची भाजी टाकून घ्यायची आहे. ती व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात बेसन पीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात थोडे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी एकदम टाकायचे नाही. थोडे हलके टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर झुणका 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे.
5 ते 10 मिनिटानंतर झुणका तयार झालेला असेल. त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. झणझणीत आणि चमचमीत असा झुणका तयार झालेला असेल. ज्वारी, तांदूळ, बाजरी आणि इतर सर्व भाकरी सोबत हा झुणका अप्रतिम लागतो. यामध्ये तुम्ही कैरी सुद्धा वापरू शकता.