साहित्य (१ किलो आवळ्यांसाठी)
- आवळे: १ किलो
- साखर किंवा गूळ: १ किलो (आवळ्याप्रमाणे)
- तूप: १-२ चमचे
- वेलची: ४-५ (ठेचलेली)लवंग: ४-५
- दालचिनी: १ इंच (ऐच्छिक)
- मीठ: चिमूटभर
कृती
- आवळा स्वच्छ धुवून घ्या.
- प्रत्येक आवळ्याला सुरीने किंवा काट्याने २-३ ठिकाणी टोचे मारा (त्यामुळे पाक आतपर्यंत जातो).
- एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून त्यावर चाळणी ठेवून आवळे १० मिनिटे वाफवून घ्या किंवा टोचलेले आवळे उकळत्या पाण्यात ५ मिनिटे ठेवा. (यामुळे आवळे कडू लागत नाहीत आणि पौष्टिक तत्व टिकतात).
- एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर/गूळ आणि अर्धा कप पाणी घ्या. त्याला एकतारी पाक येईपर्यंत उकळा.
- पाकात वेलची, लवंग, दालचिनी आणि चिमूटभर मीठ टाका.
- आता वाफवलेले आवळे पाकात टाका आणि ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
- शेवटी १ चमचा तूप घालून मिक्स करा.
- आता आवळे पूर्णपणे थंड होऊ द्या.
advertisement
advertisement
साठवणूक- पूर्ण थंड झाल्यावर मोरावळा काचेच्या बरणीत भरा. हा मोरावळा फ्रिजशिवाय वर्षभर टिकतो आणि आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो.
टीप- आवळे उकडताना किंवा वाफवताना जास्त शिजवू नका, ते फक्त थोडे मऊ झाले पाहिजेत. गूळ वापरल्यास मोरावळ्याचा रंग गडद होतो आणि चवही छान लागते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 8:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Recipe Video: आंबट गोड आवळ्याचा मुरांबा कसा बनवायचा? ठरेल आरोग्यासाठी गुणकारी; पाहा रेसिपी