खाऱ्या शंकरपाळ्यांची परिपूर्ण रेसिपी
साहित्य (4 ते 5 जणांसाठी):
मैदा – 2 कप
advertisement
रवा (सूजी) – 2 टेबलस्पून (कुरकुरीतपणासाठी)
ओवा – 1 टीस्पून
तिखट – 1/2 टीस्पून (ऐच्छिक, हलकं चवीनुसार)
मीठ – चवीनुसार
मोहनासाठी तेल – 2 टेबलस्पून
पाणी – पीठ मळण्यासाठी
तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार
Pune Metro : पुणेकरांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेट्रोच्या फेरीत बदल, वेळापत्रक पाहूनच घरा बाहेर पडा
खाऱ्या शंकरपाळ्यांची कृती:
एका मोठ्या परातीत मैदा, रवा, ओवा, तिखट, हिंग आणि मीठ एकत्र करून नीट मिसळा.
त्यात गरम मोहन (तेल) घालून हाताने मिक्स करा. मिश्रण थोडं कुरकुरीत लागतंय का, हे बघा. यावर कुरकुरीतपणा अवलंबून आहे.
मग थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्या (पूर्ण सैल नाही, पुऱ्यांच्या पीठासारखा).
गोळा झाकून साधारण 30 मिनिटं विश्रांतीस ठेवा.
त्यानंतर पीठाच्या लहान लहान गोळ्या करून पोळीसारखं लाटून घ्या. फार पातळ नाही आणि फार जाड नाही.
त्यावर सुरीने किंवा कटरने चौकोनी तुकडे करा.
कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
काढून थंड करा आणि एअरटाईट डब्यात भरून ठेवा.
टीप:
ओवा आणि हिंग यामुळे ही शंकरपाळी चविष्ट तर होतेच, शिवाय पचायलाही हलकी पडते.
रवा वापरल्याने शंकरपाळ्या जास्त कुरकुरीत होतात.
एकदा गार झाल्यावरच डब्यात भराव्यात, नाहीतर ओलसरपणा येऊ शकतो.
जिथे सर्वत्र गोडधोड असते, तिथे खाऱ्या शंकरपाळ्यांसारखा तोंडाला विरस न आणणारा आणि चवीलाही झणझणीत वाटणारा पदार्थ हवाच. दिवाळीच्या फराळाच्या ताटाला एक खमंग, कुरकुरीत वळण देण्यासाठी ही शंकरपाळी नक्की करून बघा.