अमरावती : सकाळ झाल्यानंतर प्रत्येक आईला पहिली घाई असते ती म्हणजे मुलांच्या टिफीनची. कारण मुलांना पौष्टीक सोबतच टेस्टी नाश्ता सुद्धा हवा असतो. अनेक वेळा पौष्टीक नाश्ता टेस्टी नसतो आणि टेस्टी नाश्ता पौष्टीक नसतो. तर या दोन्हींचा मेळ साधता येईल असा पदार्थ नेमका कोणता बनवयचा? हा प्रश्न प्रत्येक आईला पडत असतो. तर त्यासाठी एक ऑप्शन म्हणजे मुरमुरे आणि इतर काही साहित्य वापरून बनवलेला पराठा. मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट मुरमुरे पराठा कसा बनवायचा? त्याची रेसिपी अमरावतीमधील कोयल निंभोरकर यांनी सांगितली आहे.
advertisement
मुरमुरे पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 पाव मुरमुरे, 1 छोटी वाटी रवा, अर्धी वाटी दही, गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, जिरे, मीठ, तेल हे साहित्य लागेल.
हिवाळ्यात झटपट बनवा पौष्टीक असे ड्रायफ्रूटचे लाडू, मुलंही आवडीने खातील, पाहा रेसिपीचा सोपा Video
मुरमुरे पराठा बनवण्यासाठी कृती
सर्वात आधी सर्व फळभाज्या बारीक कापून घ्यायच्या. त्यानंतर मुरमुरे, रवा, दही हे साहित्य मिक्सर मधून फिरवून बारीक करून घ्यायचं. त्यात पाणी टाकून थोड आणखी फिरवून घ्यायचं आणि घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं. ते मिश्रण 10 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं.
10 मिनिट नंतर त्या मिश्रण मध्ये चिरलेले साहित्य टाकायचे. कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर आणि इतर मसाले. त्यानंतर ते मिक्स करून त्याच मिश्रण तयार करून घ्यायचं. त्यानंतर तव्यावर तेल टाकून ते पसरवून घ्यायचं आणि मिश्रण टाकायचं. मिश्रण सुद्धा पसरवून घ्यायचं. त्यानंतर पराठ्याच्या साइडला सुद्धा तेल टाकायचं आणि छान एका साइडने पराठा शिजवून घ्यायचा.
त्यानंतर त्याला परतवून घ्यायचा. काहीवेळा पराठा तव्याला चिकटून जातो. त्याला हळूहळू तव्यापासून वेगळा करायचा आणि परतवून घ्यायचा. दुसरी बाजू सुद्धा छान शिजवून घ्यायची. त्यानंतर पराठा तयार होईल. हा पराठा तुम्ही मुलांना टोमॅटो सॉस किंवा एखाद्या स्पेशल चटणीसोबत खाण्यासाठी देऊ शकता. अगदी कमीत कमी वेळात पौष्टीक आणि टेस्टी पराठा तयार होईल.