गुळाची पोळी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
भाजून बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचे कूट, त्यात वेलची सुद्धा टाकून घेऊ शकता. त्यानंतर गूळ, गरम करून घेतलेले तूप आणि भिजवून घेतलेले गव्हाचे पीठ हे साहित्य लागेल.
advertisement
गुळाची पोळी बनविण्याची कृती
सर्वात आधी गूळ आणि शेंगदाण्याचे सारण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी गूळ आणि शेंगदाण्याचे कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही कमी-जास्त करू शकता. गूळ जास्त टाकून हे सारण तुम्ही पुरण असतं त्याप्रमाणे देखील करू शकता. सारण तयार झालं की, लगेच पोळी करायला घ्यायची आहे. आधी छोटी पोळी लाटून घ्यायची आहे. त्यावर तूप लावून घ्यायचं. नंतर त्यात सारण भरून घ्यायचं आहे.
सारण भरून झालं की, पोळी पॅक करून घ्यायची आहे. त्यानंतर ती पोळी पुन्हा लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून झाली की, तव्याला थोडं तूप लावून ही पोळी शिजवून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने पोळी छान खमंग होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर गूळ आणि शेंगदाण्याची पोळी खाण्यासाठी तयार झालेली असेल. यामध्ये तुम्ही गुळाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता. तसेच यात वेलची पूड टाकून पोळी केल्यास चव आणखी छान लागते. ही पोळी तुम्ही मलाईचे दही किंवा श्रीखंड सोबत खाऊ शकता.





