Success Story : उच्चशिक्षण घेऊनही मिळाली नाही नोकरी, विपुलने सुरू केला फूड स्टॉल, आता दिवसाला इतकी कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. मराठवाड्यातील जालन्यातही दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांना खवय्यांची मोठी पसंती मिळत असते.
जालना: दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. मराठवाड्यातील जालन्यातही दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांना खवय्यांची मोठी पसंती मिळत असते. हीच बाब लक्षात घेऊन जालन्यातील विपुल दोडके या युवकाने चार वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात साउथ इंडियन खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरू केले आहे. ग्राहकांना कमी किमतीत उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ मिळत असल्याने अल्पावधीतच त्याच्या या स्टॉलने लोकप्रियता मिळवली आहे.
विपुल दोडके आणि त्याचा बंधू मयूर या दोघांनी मिळून चार वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरातील मुख्य चौकात हॉटेल न्यू जय दुर्गा या नावाने साउथ इंडियन खाद्यपदार्थांचा स्टॉल सुरू केला. इडली, डोसा, मसाला डोसा, मेंदू वडा यांसारखे खाद्यपदार्थ हे दोन्ही बांधव ग्राहकांना कमी किमतीत आणि उत्तम दर्जाचे खायला देतात.
advertisement
विपुलचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या संधी कमी उपलब्ध असल्याने त्याने व्यवसायात येण्याचे ठरवले. स्वतःच्या मामाच्या आझाद मैदान येथील साउथ इंडियन खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर काही दिवस काम केले. चार वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशन येथे स्वतःचे हॉटेल सुरू केले. सध्या या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून तो दिवसाला सात ते आठ हजारांची उलाढाल करतो. यातून तीन ते चार हजारांची निव्वळ कमाई तो करत आहे.
advertisement
सांभार आणि दोन चटण्यांमुळे ग्राहकांची पसंती शेंगदाणे, मिरची पावडर, चिंच, गूळ इत्यादी वापरून लाल चटणी तयार केली जाते. मूग, उडदाची डाळ आणि अन्य मसाले मिक्स करून सांभार तर खोबरे, तीळ इत्यादी खाद्यपदार्थ वापरून पांढरी चटणी तयार केली जाते. या दोन चटण्या आणि सांभार यामुळे ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणावर आमच्या स्टॉलकडे आकर्षित झाला आहे, असे व्यावसायिक विपुल दोडके यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
advertisement
काय काय मिळते, किंमत किती
view commentsमसाला डोसा 30, बटर डोसा 35, शेजवान डोसा 35, चीज डोसा 45, पनीर डोसा 40, इडली 25, उत्तप्पा 35, उपमा 30, वडा 30 अशा प्रकारे माफक दरात इथे साऊथ इंडियन खाद्यपदार्थ मिळतात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
October 30, 2025 5:38 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : उच्चशिक्षण घेऊनही मिळाली नाही नोकरी, विपुलने सुरू केला फूड स्टॉल, आता दिवसाला इतकी कमाई

