वर्धा : गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाला घरोघरी गोडाधोडाचा नैवेद्य बनविला जातो. त्यामुळे यावर्षी कोणता नवीन पदार्थ बनवावा असा प्रश्न गृहिणींना पडला असेल तर यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त रताळ्याची खीर तुम्हाला घराच्या घरी बनवता येईल. ही खीर अगदी सोप्या अश्या पद्धतीनं कशी करायची? याबद्दच वर्धा येथील गृहिणी मीना शिंदे यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
खीर बनवण्यासाठी साहित्य
दोन-तीन रताळी, चवीनुसार साखर, वेलचीपूड, वाटीभर दूध, 2 टीस्पून साजूक तूप, काजू आणि बदामाचे बारीक केलेले काप हे साहित्य लागेल.
हॉटेलमधला चमचमीत पनीर टिक्का करी मसाला घरीच बनवा; ही पाहा रेसिपी, VIDEO
खीर बनवण्याची कृती
सर्वप्रथम रताळी उकडून थंड झाल्यावर त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. आता हे साल चांगले कुस्करून घ्यायचे आहेत. आता गॅसवर कढईत साजूक दोन चमचे तूप घालून त्यात स्मॅश केलेली रताळी टाकायची आहेत. चांगली परतून घ्यायचे आहेत, तुपात रताळी चांगला भाजून झाल्यानंतर त्यात वाटीभर दूध अॅड करायचे आहेत आणि आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचा आहे. यात रताळ्याच्या गुठळ्या राहता कामा नये. छान एकजीव झाल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड टाकायची आहे. आता एक उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवून नंतर त्यात ड्रायफ्रूट्स अॅड करून रताळ्याची गरमागरम खीर खाण्यासाठी तयार आहे.