मोदक बनवण्यासाठी साहित्य:
तांदळाचे पीठ (कच्चे): 2 कप
पाणी: 2 कप (किंवा आवश्यकतेनुसार)
दूध (ऐच्छिक): 2 चमचे
साजूक तूप: 1 चमचा
मीठ: चिमूटभर
सारणासाठी:
ओले खोबरे (खवलेले): 1.5 कप
गूळ (किसलेला): 3/4 कप (चवीनुसार)
साजूक तूप: 1 चमचा
खसखस (भाजलेली): 1 चमचा (ऐच्छिक)
वेलची पूड: 1/2 चमचा
जायफळ पूड: चिमूटभर
advertisement
सुकामेवा (काजू, बदाम, मनुके, तुकडे): 1-2 चमचे (ऐच्छिक)
मोदक बनवण्याची कृती:
सारण बनवणे:
एका भांड्यात तूप गरम करा. त्यात खोवलेलं खोबरं, किसलेला गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत आणि मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत परता.
वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिक्स करा. सुकामेवा घालून बाजूला ठेवा.
उकडीची पारी बनवणे:
एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी, दूध, तूप आणि मीठ घालून उकळी आणा. उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ हळूहळू टाका आणि एका मोठ्या चमच्याने किंवा लाटण्याच्या दांड्याने पटापट ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. पीठ एकत्र गोळा झाल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजू द्या. नंतर हे मिश्रण एका मोठ्या परातीत काढून घ्या. गरम असतानाच हाताला तूप लावून पीठ चांगले मळून घ्या, जेणेकरून ते मऊ आणि गुळगुळीत होईल.
Famous Food Pune : अस्सल घरगुती जेवण, फक्त 30 रुपयात, पुण्यात हे आहे लोकेशन
मोदक बनवणे: मळलेल्या पिठाचा छोटा गोळा घ्या आणि त्याची पारी (पुरीसारखी) तयार करा. कडेने पातळ आणि मध्यभागी थोडी जाड ठेवा. त्यात तयार सारण भरा आणि पारीला कळ्या पाडत मोदकाचा आकार द्या.
वाफवणे: स्टीमरमध्ये किंवा चाळणीत पाणी गरम करा. मोदक प्लेटवर ठेवून 10-15 मिनिटे वाफवून घ्या.
टिप -
1. चाळणीला तेल किंवा तूप लावल्यास मोदक चिकटत नाहीत.
2. एखादा मोदक बनवताना फुटला असेल तर तो वाफ देण्यासाठी एकत्र ठेवू नका.
पूर्ण मोदक लालसर होऊन चिकट होतात.





