Famous Food Pune : अस्सल घरगुती जेवण, फक्त 30 रुपयात, पुण्यात हे आहे लोकेशन

Last Updated:

लक्ष्मी इंगळे गेल्या एक वर्षापासून हे भोजनालय चालवत आहेत. स्वतः हॉस्टेलमध्ये राहून आणि मेसचे जेवण अनुभवत असताना, खूप पैसे देऊनही समाधानकारक जेवण मिळत नाही, ही त्यांची भावना होती.

+
News18

News18

पुणे : पुणे हे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो तरुण UPSC, MPSC, सरळसेवा यांसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येत असतात. मात्र वाढती महागाई, घरभाडे आणि इतर खर्चांमुळे अनेक विद्यार्थ्यांना पोटभर, सकस जेवण मिळणे कठीण जाते. हीच गरज ओळखून परभणीच्या मूळ रहिवासी असलेल्या लक्ष्मी इंगळे यांनी पुण्यातील सदाशिव पेठेत अवघ्या 30 रुपयांत पोटभर जेवण देणारी श्री भोजनालय ही अनोखी संकल्पना सुरू केली आहे.
लक्ष्मी इंगळे गेल्या एक वर्षापासून हे भोजनालय चालवत आहेत. स्वतः हॉस्टेलमध्ये राहून आणि मेसचे जेवण अनुभवत असताना, खूप पैसे देऊनही समाधानकारक जेवण मिळत नाही, ही त्यांची भावना होती. त्यासाठी त्यांनी सात महिने मेसचे कामही केले. या अनुभवातूनच आपणच असा व्यवसाय का सुरू करू नये, जिथे कमी पैशात चांगलं, घरचं जेवण मिळेल, असा विचार त्यांच्या मनात आला.
advertisement
बाहेर एका वेळच्या जेवणासाठी जेवढे पैसे खर्च होतात, त्याच पैशांत इथे दोन वेळचं जेवण मिळावं, आणि त्यातून विद्यार्थ्यांना थोडी मदतही व्हावी, या उद्देशाने त्यांनी 30 आणि 50 रुपयांच्या थाळ्या सुरू केल्या. या थाळ्यांमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, वेलभाज्या, पिठलं-भरीत, वरण-भात असा सकस आणि रोज बदलणारा मेनू असतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना घरच्यासारखी चव मिळते.
advertisement
30 रुपयांच्या थाळीत दोन चपात्या, वरण-भात आणि आवडीची एक भाजी दिली जाते. चपात्या त्या दुसऱ्या एका महिलेकडून घेतात, ज्यामुळे तिच्या उत्पन्नालाही हातभार लागतो. उर्वरित संपूर्ण जेवण लक्ष्मी इंगळे स्वतः तयार करतात. दररोज साधारण 150 ते 300 प्लेट जेवणाची विक्री होते.
या भोजनालयात केवळ स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीच नव्हे, तर रिक्षाचालक, कामगार वर्ग, नोकरदार आणि परिसरातील गरजू नागरिकही जेवायला येतात. कमी किमतीत स्वच्छ, पौष्टिक आणि प्रेमाने बनवलेलं जेवण मिळत असल्याने ‘श्री भोजनालय’ अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. लक्ष्मी इंगळेंची ही संकल्पना केवळ व्यवसाय न राहता, पुण्यातील अनेक पोटांची भूक भागवणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श उपक्रम ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Famous Food Pune : अस्सल घरगुती जेवण, फक्त 30 रुपयात, पुण्यात हे आहे लोकेशन
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement